Social Sciences, asked by shreyashwadi, 4 months ago

चित्रपट कथा कशी सांगितली जाते?​

Answers

Answered by alpeshkumar4762
3

Answer:

चित्रपटाच्या लिखाणाला प्रत्यक्ष सुरुवात करण्या आधी आपण कथेचे तीन भाग करावेत असा सर्व साधारण नियम आहे. काही लेखक लिहिण्या साठी आपल्या कथेची पांच किंवा सात भागात विभागणी करतात. पण आपण तीन भाग करण्याच्या मार्गाने विचार करू. तसा कोणत्याही पद्धतीने मोठा काही फरक पडत नाही. कारण हा आपापल्या सोयीचा भाग असतो. लेखक आपल्या कथा विचारांची मांडणी कशी करतो यावर ते अवलंबून असते. त्यामुळे दर्शकांच्या अनुभूतीला काहीही फरक पडत नाही.

कथेची विभागणी करायची याचा अर्थ असा नाही की कथेचे तुकडे करायचे असतात. कथा सर्वथा सलग आणि प्रवाही असायला हवी असते. हे भाग लिहिण्याच्या सोयी करिता करायचे पण ते वाटायला नकोत.

Similar questions