चंद्र ग्रहण ची वैशिष्ट्ए मराठी मध्ये.
Answers
Explanation:
चंद्र ग्रहण ची वैशिष्ट्ए
जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णत: वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही, कारण चंद्रकक्षा व क्रांतिवृत समपातळीत नसून त्यांच्या पातळयांमध्ये ५ अंशांचा ९' चा कोन आहे.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सूर्यप्रकाशामुळे पडणारी पृथ्वीची सावली ही प्रछाया व उपछाया अशी दोन प्रकारची असते. प्रछाया ही सावलीच्या मध्यभागी व उपछाया प्रछायेच्या भोवती असते. प्रछायेत सूर्यकिरणे अजिबात नसतात. उपछायेत मात्र सूर्यकिरण सुर्याच्या एका भागातून येतात.
चंद्र परिभ्रमण करत प्रथम उपछायेत येतो. त्यावेळी चंद्रप्रकाश कमी होतो. यालाच ग्रहणाचे वेध लागले असे म्हणतात.
त्यानंतर चंद्र प्रछायेत येतो तेव्हा चंद्राचा भाग झाकाळलेला दिसतो. तेव्हा चंद्रग्रहण लागले असे म्हणतात.
कालांतराने चंद्र प्रछायेतून बाहेर पडतो व पुन्हा प्रकाशित होतो. तेव्हा ग्रहण सुटले असे म्हणतात. त्यानंतर काही काळ चंद्र उपछायेत असतो तेव्हा त्याचा प्रकाश कमी असतो.
काही वेळाने जेव्हा चंद्र उपछायेतून बाहेर पडतो तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीसारखा प्रकाशमान होतो. चंद्रग्रहणे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे दिसतात.
hlo world