चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे उच्च शिक्षण कोणत्या गावी झाले?
Answers
Answer:
ज्येष्ठ गांधीवादी दादा धर्माधिकारी यांचे सुपुत्र असलेल्या चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यावरही लहानपणापासून गांधी तत्वज्ञानाचा प्रभाव राहिला. त्यांचा जन्म रायपूर (छत्तीसगड) येथे 20 नोव्हेंबर 1927 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रायपूर येथे झाल्यानंतर वर्धा येथील नवभारत विद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. महात्मा गांधी यांच्या प्रभावाखाली असलेल्या दादा धर्माधिकारी यांनी वर्धा येथील शाळेत त्यांना शिक्षण दिले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात एसबी सीटी महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात झाले. 1958 मध्ये त्यांनी कायद्याची पदवी मिळवून नागपुरात वकीली सुरू केली. 1965 त्यांची सहाय्यक सरकारी वकील म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली. 1972 मध्ये ते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. या काळात त्यांनी महिलांचे अधिकार, आदिवासींचे हक्क व अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर आधारित अनेक वैशिष्ट्यपूर्ण निकाल दिले. आणिबाणीच्या काळातही त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा अधिकारी कुणी हिरावू शकत नाही, असा निकाल देऊन सरकारी दबावाला डगमगले नाही. 1989 मध्ये ते सेवानिवृत्त झाले.
यानंतरही ते अनेक सामाजिक संस्थांचा त्यांचा संबंध राहिला. बहुतेक गांधीवादी संस्थांमध्ये त्यांचा शब्द अखेरचा मानला जात होता. ते जमनालाल बजाज फाऊंडेशनचे विश्वस्त होते. तसेच नागपुरात सर्वोदय आश्रमाचे अध्यक्ष होते. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भारत सरकारने 2003 मध्ये त्यांना पद्मभूषणने सन्मानित केले. महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या तत्वज्ञानाचा त्यांच्यावर प्रभाव राहिला. त्यांना गांधीतत्वज्ञानाचा प्रसार व भूदानच्या क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. आयुष्याच्या अखेरपर्यंत युवकांना त्यांनी गांधी व विनोबा समजावून सांगण्याचे कार्य केले. ते एक प्रखर वक्ते म्हणूनही राज्याला परिचित होते.