चौदण्या रात्रीतल भाजन
Marathi Essay
Answers
Answer:
चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा
मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा !
आणिले धागे तुझे तू मीहि माझे आणिले
गुंफिला जो गोफ त्याचा पीळ तू विसरून जा !
मी दिली वचने तुला अन् वाहिल्या शपथा खुळ्या
शब्द केवळ ते तयांचा अर्थ तू विसरून जा !
प्रीतिचे हितगूज ते, कुजबुज ती, रुसवेहि ते
ते हसू अन् आसवे ती- आज तू विसरून जा !
चंद्र ज्याला साक्ष होता, जे फुलांनी पाहिले
रेखिले प्राणांत जे मी तेच तू विसरुन जा
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | Essay on star night trip in marathi
निबंध 1
नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध, तुम्ही आजवर दिवसा ढवळ्या सहलीला गेले असाल पण चांदण्या रात्री सहलीला गेल्यास काय अनुभव येतो व कोणते नयनरम्य वातावरण आपल्याला बघायला मिळु शकते याचे वर्णन करण्यात आले आहे चला तर मग सुरू करूया , चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध Essay on star night trip in marathi. यामध्ये ३ वेगवेगळे निबंध देण्यात आले आहेत.
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध लिहीताना मनात पुढील गोष्टी आल्याशिवाय राहत नाही. दिवसभराची सहल, वर्षा सहल, पहाटेची सहल, सायकलवरून सहल, गडावरचा फेरफटका असे सहलींचे विविध प्रकार आमच्या मित्रमंडळींनी आजवर अनुभवले होते. यावेळी कशी कुणाला ठाऊक कुणाच्या डोक्यातून कल्पना आली की, आपण 'चांदण्या रात्रीची सहल' काढू या. एकदा कल्पना निघाली की, ती साकार करण्यास आमच्या मित्रांना विलंब लागत नाही.
मे महिन्याचे दिवस होते; आकाशावर आक्रमण करण्याचे ढगांनी अदयापि योजिले नव्हते. त्यामुळे वैशाखी पौणिमेचा दिवस निश्चित करण्यात आला. या दिवशी जंगलातील जाळयांतील करवंदे तयार होतात अशी माहिती कुणी तरी पुरविली, तेव्हा मुद्दाम डोंगराकडे जायचे असे एकमताने ठरले; आणि रात्री दहानंतर आम्ही सहलीसाठी प्रस्थान ठेवले.
गावातून बाहेर पडताना लक्षात आले की, सारे गाव शांतपणे झोपले होते, आपणच वेड्यासारखे घराबाहेर पडलो आहोत नाही. तरी थोडासा वेडेपणा केल्याशिवाय कोणतेही असामान्यत्व गवसतच नाही पौणिमेचे चांदणे लक्षात घेऊन नगरपालिकेने आज रस्त्यावरचे दिवे लावलेच नव्हते. पण स्वच्छ पसरलेल्या कौमुदीने त्यांची उणीव भासू दिली नव्हती. कोणताच कृत्रिम प्रकाश नसल्यामुळे चांदण्याचे खरेखुरे सौंदर्य आम्हांला तेव्हाच उमगले. चांदण्याला 'पिठूर' हे विशेषण लावणारी व्यक्ती खरोखरच कविमनाची!
मे महिन्याचे दिवस असूनही ते चांदणे आपली शीतलता जाणवून देत होते. दिवसभर होणारा अंगाचा दाह केव्हाच कुठे गायब झाला होता, त्यामुळे सहलीची लज्जत अधिकच वाढली होती. आजूबाजूच्या बंगल्यांच्या बागांतून फुललेल्या सायंकाळच्या फुलांच्या व रातराणीच्या मादक गंधाने सारे वातावरण भरून गेले होते. अशा वातावरणात शब्द मुके न झाले तरच नवल! त्या प्रसन्न चांदण्यात न्हाऊन निघत असताना आम्ही गावाबाहेर केव्हा पडलो ते कळले देखील नाही
डोंगरचढणीचे दृश्य तर अनुपम होते. डोंगरांनी रुपेरी शाल पांघरली आहे असे वाटत होते. करवंदांच्या जाळ्यावर तर चांदीची फुलेच फुलल्याचा भास होत होता. पायाखालच्या मातीचा स्पर्शही आगळावेगळा वाटत होता. दुपारच्या तळपत्या सूर्यकिरणांत पायांना टोचणारे आणि डोळ्यांत पाणी आणणारे सारे दगडगोटे कोठेतरी नाहीसे झाले होते आणि चांदण्याने धुऊन निघालेली ती भूमाताही मृदुमुलायम झाली होती. मला एकदम आठवण झाली कवी कुसुमाग्रजांची. त्यांनी आकाशातील या पूर्णचंद्राला 'स्वप्नांचा सौदागर' म्हणून संबोधिले आहे.
माझी ही आठवण मी माझ्या दोस्तांना ऐकविली, तेव्हा त्यांनाही अनेक आठवणी दाटून आल्या. मग चांदण्याच्या गाण्यांचा पूर लोटला. जाळीत पिकणाऱ्या डोंगरच्या मैनेच्या कहाण्या आतापर्यंत केवळ ऐकल्या होत्या. पण आता समोर ती पसरली होती. त्यांचा आस्वाद घेताना बरोबर आणलेल्या खाऊच्या डब्यांची.आठवणही झाली नाही. पण आमच्या दोस्तांनी तेथेही रसिकता दाखविली होती. रुपेरी चांदण्यात खाण्यासाठी निवडलेल्या वस्तूही तशाच होत्या. पांढरी "स्वच्छ मलईची बर्फी, पांढरीशुभ्र हलकीफुलकी इडली आणि मस्त, मऊ दहीभात.
रात्रभर त्या चांदण्यात लोळत असताना दुःख, द्वेष, चिंता हे सारे विकार हद्दपार झाले होते; साथ होती ती फक्त त्या चंद्रप्रकाशाचीच. कुणीतरी दोस्त त्या आकाशातील ग्रहतायऱ्यांची नावे सांगून त्यांची ओळख देऊ लागला. पण छे! ते रुक्ष शास्त्र कुणालाच तेथे रुचले नाही. तेथे कोणी शनी नव्हते, कोणी ध्रुव नव्हता, कोणी अरुंधती नव्हती. मग होते काय? लहानपणचा एक उखाणा आठवला, 'परडीभर फुले तुलाही वेचवेनात, मलाही वेचवेनात!'
यापूर्वी अनेक सहली काढल्या होत्या, पुढेही काढू, पण चांदण्या रात्रीची ती सहल अगदी आगळीवेगळीच!
मित्रांनो चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | Essay on star night trip in marathi हा निबंध कसा वाटला व तुम्ही गेलेल्या सहलीचा गमतीदार अनुभव तुम्ही कमेंट करून आमच्य पर्यंत पोहचवु शकता . धन्यवाद