चक्रधर स्वामी नी कीर्ती कठियाचा दृष्टांत संगीतला कारण
Answers
- ये कहानी हैँ, 800 वर्ष पुर्व महानुभाव पंथ के संस्थापक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की, जिन्होने कलियुग मेँ अवतार लेकर जिवोँके उध्दार करने का व्यसन स्वीकारा ।
- श्री चक्रधर स्वामी 12 वी सदी में हुए परमेश्वर अवतार हैं.
- महानुभाव पंथ की स्थापना सन 1267 में भगवान श्री चक्रधर स्वामी ने ही की थी।
- हरिपाल का जन्म गुजरात के भड़ोच में हुआ था। इनके पिता का नाम विशालदेव और माता का नाम मालिनी देवी था। विशालदेव भड़ोच (गुजरात) राजा के यहाँ प्रधान थे.
- हरिपाल का विवाह कमलाईसा से हुआ था. उनका एक पुत्र था जिसका नाम महिपाल था।
- जब हरिपाल बडेँ हुयेँ तो दो बार सिंघन राज्य के साथ युद्ध कर विजयी हुए। इस युद्ध के पश्चात शक 1143 वृषभ संवत्सर भाद्रपद शुक्ल द्वितीया, शुक्रवार (ता. 20-08-1221) को रोगवश उनकी 25 वर्ष की आयु मेँ हरिपाल की मृत्यु हो गई। शोक मग्न स्थिती में शव चिता पर दाह संस्कार के लिए रखा। उसी समय द्वारावतीकार भगवान श्री चक्रपाणि ने कामख्या नामक हठयोगिनी के दुराग्रह से देह त्याग करके दिनांक 20.08.1221 को हरिपाल देव के मृत शरीर में प्रवेश किया। हरिपाल को जीवित देख, सबको आश्चर्य और प्रसन्नता हुई|
Answer:
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे वास्तव्य डोमेग्राम (सध्याचे कमालपुर ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर) येथे असताना ही प्रस्तुतची लीळा घडलेली आहे. गोदावरी नदीच्या काठावर असणाऱ्या या गावात एक दिवस सकाळचा पुजाविधी आटोपल्यानंतर (उदेयाचा-सकाळी)सर्वज्ञांच्या ठिकाणी परीवारातील भक्तजन मातीकाम करीत होते. ते हिवाळ्याचे दिवस आणि नदीकाठ त्यामुळे प्रचंड प्रमाणात थंडी वाजत होती. (सी - थंडी) त्यामुळे भक्तजनाना काम करता येत नव्हते. मात्र स्वामींचे एक शिष्य नागदेव (लीळाचरित्रात नागदेवआचार्यांचा उल्लेख भट या नावाने ही आढळतो) यांचे मात्र तसल्या थंडीतही काम चालुच होते।
Explanation:
ते पाहुन स्वामींचे दुसरे शिष्य नाथोबा त्यांना म्हणतात 'हे काय नागदेवा तुला थंडी वाजत नाही का ?(हीवसी ना - थंडी वाजत नाही का ?) यावर नागदेव उत्तर देतात, आम्ही वैरागी माणसे साधु संत आम्हाला कसली आलीय थंडी. हा चाललेला प्रसंग सर्वज्ञ पाहत होते ते नागदेवाचे उत्तर ऐकुन म्हणतात, 'हे बघा जीवाला स्वतःचे वैराग्य सुध्दा मिरवायला आवडते, जीव असा आहे की तो आपल्या वैराग्याचे ही प्रदर्शन मांडतो कारण त्याला समोरच्या कडून प्रशंसेची कौतुकाची अपेक्षा असते. 'हे असे वागणे 'हे विकाराचेच कार्य आहे (विकार म्हणजे सामान्य अर्थाने आवडी, लालसा) यावर नागदेवानी सर्वज्ञाना विचारले 'तुम्ही म्हणतात की जीवाला वैराग्याचे प्रदर्शन करायला आवडते हा एक विकार आहे तर मग या संसारात निर्विकार असा कोण आहे।
यावर स्वामी सांगतात की ' या संसारामध्ये कोणताही जीव विकारावेगळा होत नाही' यावर स्वामींनी कीर्तीकठीयाचा दृष्टांत निरुपण केला. (कीर्ती - प्रसिध्दी, कठीया - पुजारी)(दृष्टांत - स्वामी निरनिराळ्या प्रसंगी आपल्या प्रवचनात एखादा तत्वज्ञानपर विषय समजावताना एखादे उदाहरण देत कथा आख्यायिका सांगत, त्यालाच दृष्टांत असे म्हणतात.) सर्वज्ञ सांगतात कोणत्यातरी एका गावात एक पुजारी राहायचा. तो त्या गावातील एका नवसिक देवतेची भक्ती करायचा. त्या ठिकाणी राहुन देवतेची सेवा करायचा झाडलोट करणे, सडा संमार्जन करणे, सारवणे स्वच्छता ठेवणे ही सर्व कामे तो त्या ठिकाणी करीत असे. त्याची ही स्वच्छता पाहुन गावची लोक त्याची स्तुती करु लागले, प्रशंसा करु लागले, लोक म्हणत पुजारीबाबा चांगले करत आहात. सर्व कसे सुंदर करीत आहात. प्रशंसेेच्या स्तुतीच्या हव्यासापायी तो दिवसेंदिवस अधिकाधिक स्वच्छताच करु लागला. हातहातभर वाढीव स्वच्छता करु लागला .कारण त्यामुळे लोक त्याची अधिकाधिक स्तुती प्रशंसा करीत असे. याचा परिणाम असा झाला की तो पुजारी देवताभक्ती पेक्षा स्वच्छतेलाच जास्त महत्व देऊ लागला. परिणामत्वे देवतेची पुजाअर्चा उपासना तो करेनासा झाला. याचा तात्पर्यार्थ सांगताना स्वामी सांगतात की ,त्याच्या अशा करण्यामुळे देवता त्याच्यावर उदास झाली त्यामुळे देवतेनी त्याला आपले भक्तीच्या उपरांत मिळणारे साध्यफळ दिलेच नाही' त्याला लोकांची स्तुती हेच फळ मिळाले. यावरुन सिध्दांतबोध असा की लोक आपल्या प्रसिध्दीसाठी आपल्या कामाचे प्रदर्शन करताना आढळतात परंतु यातून त्यांचे ध्येय सिध्द न होता. फक्त कीर्तीच होते।