Social Sciences, asked by gavaneumesh551, 1 month ago

चक्रधर स्वामी नि महाराष्ट्रात कोणता पंथ स्थापण केला 7वी समाजशास्त्रज्ञ​

Attachments:

Answers

Answered by bhavnatjadhav
0

answer

ज्ञानेश्वरांच्या काही काळ अगोदर 'महानुभाव' संप्रदाय महाराष्ट्रात उदयास आला. ‘महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य सः महानुभावः’ या दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो महानुभाव पंथ, असे म्हटले जाते. वि.भि. कोलते यांच्या मते (पहा : लोकशिक्षण, वर्ष ७, अंक ४/५) या संप्रदायाचे मूळचे नाव ‘परमार्ग’ असे असून महानुभाव पंथ हे नाव प्रथम एकनाथांनी वापरले असल्याचे शं. गो. तुळपुळे म्हणतात.

समाजात चातुर्वर्ण्याची मिरासदारी वाढलेली असण्याच्या काळात परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधरांनी स्वामींनी वैदिक तत्त्वज्ञानाला बाजूला करून (ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय करून) आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला आणि सर्वच देवतांचे प्रस्थ कमी केले. देवतांच्या पूजेचा निषेध केला.आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर हल्ला चढविला. आपल्या पंथात त्यांनी स्त्रिया, शूद्र, सकलजाती, बहुजन सर्वांनाच दीक्षा घेण्याची सोय ठेवली. संपूर्ण अहिंसा आणि कडकडीत वैराग्य यांचे पालन आपल्या संप्रदायात अपरिहार्य मानले. धर्माचे रहस्य आपल्या बोलीभाषेत सांगणाऱ्या जैनसंप्रदायांप्रमाणो जनभाषेत आपले तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला.

please mark it brianlist answer plz

Similar questions