*चला मंडळी,चालवा डोकं !*
खालील उत्तर तीन अक्षरी असून शब्दांची सुरुवात ' सं ' या अक्षराने आहे . बाराखडी नाही .
उदा .
प्रश्र्न परस्परातील बोलणे
उत्तर संवाद
१ मनावरील ताबा - संयम
२ क्रोध- संताप
३ परिस्थितीशी लढा
४ जाणे येणे , ऊठ बस
५ एकत्र येणे , जोडले जाणे
६ मागील दुवा , उल्लेख
७ इशारा
८ सूर , ताल , लय
९ रुजलेले विचार
१० जमवलेल्या वस्तू
११ दोन प्रकारांचे मिश्रण
१२ एक भाषा
१३ भेटी गाठी
१४ सगळे
१५ साठा
१६ भ्रमण
१७ प्रपंच
१८ मिसळलेले
१९ तंतुवाद्य
२० लोककलेतील वाद्य
२१ परिपूर्ण
२२ अपत्य
२३ हा केसांचा असतो
२४ शंका
२५ सहवास
२६ पेटी
२७ लज्जा , आकसणे
२८ अरुंद , चिंचोळा
२९ धन
३० पार्लमेंट
३१ लागण
३२ मनाशी ठरविलेले
३३ थोडक्यात
३४ लागेबांधे
३५ शक्यता
३६ जोडलेले
३७ मोघम
३८ साठलेले कर्म
३९ बंदूक
४० मान्यता
४१ समाधान
४२ एकत्र येणे
४३ किंतु , शंका
४४ आपत्ती
४५ एक सण
४६ इशारा
४७ वतनदार खानदान
४८ क्रोधित
Answers
योग्य शब्द आहेतः
१ मनावरील ताबा - संयम
२ क्रोध - संताप
३ परिस्थितीशी लढा - संघर्ष
४ जाणे येणे , ऊठ बस - संपर्क
५ एकत्र येणे , जोडले जाणे - संगम
६ मागील दुवा , उल्लेख - संदर्भ
७ इशारा - संकेत
८ सूर , ताल , लय - संगीत
९ रुजलेले विचार - संस्कार
१० जमवलेल्या वस्तू - संग्रह
११ दोन प्रकारांचे मिश्रण - संकर
१२ एक भाषा - संस्कृत
१३ भेटी गाठी - संपर्क
१४ सगळे - संपूर्ण
१५ साठा - संचय
१६ भ्रमण - संचार
१७ प्रपंच - संसार
१८ मिसळलेले - संमिश्र
१९ तंतुवाद्य - संतूर
२० लोककलेतील वाद्य - संबळ
२१ परिपूर्ण - संपूर्ण
२२ अपत्य - संतान
२३ हा केसांचा असतो - संभार
२४ शंका - संदेह
२५ सहवास - संगत
२६ पेटी - संदूक
२७ लज्जा ,आकसणे - संकोच
२८ अरुंद , चिंचोळा - संकिर्ण
२९ धन - संपत्ती
३० पार्लमेंट - संसद
३१ लागण - संसर्ग
३२ मनाशी ठरविलेले - संकल्प
३३ थोडक्यात - संक्षिप्त
३४ लागेबांधे - संबंध
३५ शक्यता - संभव
३६ जोडलेले - संलग्न
३७ मोघम - संदिग्ध
३८ साठलेले कर्म - संचित
३९ बंदूक - संगीन
४० मान्यता - संमती
४१ समाधान - संतुष्ट
४२ एकत्र येणे - संगम
४३ किंतु , शंका - संशय
४४ आपत्ती - संकट
४५ एक सण - संक्रांत
४६ इशारा - संकेत
४७ वतनदार खानदान - संस्थान
४८ क्रोधित - संताप
Learn more :
1) Essay on my online school in marathi
brainly.in/question/19078408
2) Butta BOMMA meaning in Marathi
brainly.in/question/16139631