India Languages, asked by S34N, 1 year ago

Can someone please write an essay on.. मी अनुभवलेला संधयाकाळ

Answers

Answered by spriya
1
माझी गडचिरोली सफ़र - एक थरारक अनुभव
"गडचिरोली" नाव ऐकुनच डोळ्यासमोर काही येत असेल तर ते घनदाट अरण्य आणि नक्षलवादी ...
बाकी याबद्दल काही माहित होते तर ते एवढेच की महाराष्ट्राच्या एखाद्या कोपर्‍यात वसलेले गाव.. की जिल्हा... की जंगल असावे.. पण तो नक्की कोणता कोपरा हे देखील मी कधी महाराष्ट्राच्या नकाशावर शोधण्याचे कष्ट घेतले नव्हते..
पण माझ्या गावीही नसलेल्या ह्या गावी मला आयुष्याच्या एका महत्वाच्या वळणावर जावे लागेल हे माहित नव्हते..मी अभिषेक अशोक नाईक, अका तुमचा अभिषेक, शाळेतील एक हुशार मुलगा, पण मुळातच अभ्यासाची आवड नसल्याने आणि आळशी स्वभावामुळे कसेबसे माझे शिक्षण झाले. आणि झालो एकदाचा स्थापत्य अभियंता. मुंबईतील V.J.T.I. या नावाजलेल्या कॉलेजचा विद्यार्थी असल्याने Campus Interview मधुन कान्दिवलीच्या एका चांगल्या कंपनी मध्ये नोकरीही लागली. पहिल्याच दिवशी कंपनीच्या मालकानी सर्व नवीन मुलांची शाळा घेतली. आपल्याकडे काय काम चालते, कसे चालते, हे सांगितले. कंपनीची लाल करुन झाली. शेवटी म्हणाले, "मुलानो तुम्ही Civil Engineering मध्ये आला आहात, इथे Hardwork ला पर्याय नाही..." पहिल्याच दिवशी माझ्यासारख्या कामचुकार योद्ध्याचे खच्चीकरण करण्याचा यापेक्षा दुसरा सोपा मार्ग नसावा. मनात आले, की सर तुम्ही आधी का नाही भेटलात, आलोच नसतो या लाईन ला..पुढे ४-५ महिन्यातच मला कळून चुकले की इधर मेरे जैसे आलसी इन्सान का टिकाव लगना मुश्कील है.. पाच आकडी पगाराने सुरुवात तर झाली होती पण पुढची जवानी तो सहा आकडी करण्यात मला घालवायची नव्हती आणि मग दुसरे पर्याय शोधायला सुरुवात झाली. अशातच MPSC ची जाहिरात आली आणि सरकारी नोकरीचा साधा सरळ पर्याय दिसू लागला. फ़क्त एक परीक्षा की काय पास व्हायचे होते. फॉर्म भरला आणि आठवडाभर सुट्टी टाकून दिली. अभ्यास फारसा केला नसुन देखील परीक्षा बरी गेली. मग सुरु झाली ती निकालाची प्रतिक्षा... वर्ष सरले.. सरकारी कारभार ना.. मनोमन ठरवले, ठिक आहे, मी सुद्धा तुमच्याकडे कामाला लागल्यावर अशीच टंगळमंगळ करतो बघा प्रत्येक कामात.. मधल्या काळात नोकरी बदलली, रिलायंन्स मध्ये कामाला लागलो. हो ना करता वर्षभराने लागला एकदाचा निकाल. चांगल्या मार्काने पास होऊन तोंडी मुलाखतीच्या राऊंडसाठी माझी निवड झाली होती
Similar questions