१. चतुर्थक व्यवसाय सर्वत्र का दिसत नाहीत ?
Answers
Answer:
तृतीयक व्यवसाय : सेवा व्यवसायांचा तृतीयक व्यवसायात समावेश होतो. कच्चा मालापासून पक्का माल तयार करण्याची प्रक्रिया सतत चालू राहावी यासाठी कच्चा माल प्रक्रिया केंद्रापर्यंत नेण्याची गरज असते. तसेच उत्पादन प्रक्रिया सतत चालू राहण्यासाठी उत्पादनाचे वितरण आवश्यक असते. या वितरणासाठी म्हणजे पक्का माल बाजारपेठेपर्यंत तसेच ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी सेवांची गरज असते. अशा आवश्यक सेवा तृतीयक व्यवसाय पुरवतात. तृतीयक व्यवसाय प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत सहभागी होत नाहीत. मात्र उत्पादन वाढीस मदत करतात. इतर व्यवसायांना मदत करतात. वस्तूंचे वितरण म्हणजेच वाटप करणे हे तृतीयक व्यवसायाचे मुख्य कार्य आहे. उदा.:- रस्ते, लोहमार्ग, टेलिफोन, चित्रपट, रेडिओ, दूरदर्शन, बँक, विमा, गवंडी, लोहारकाम, शालेय शिक्षण, सुतारकाम, कोतवाल, शिंपी, तयार केलेल्या वस्तूंची विक्री करणे इत्यादींचा समावेश तृतीयक व्यवसायात होतो. चतुर्थक व्यवसाय : हे बौद्धिक क्षमतेवर आधारलेले असतात. चतुर्थक व्यवसायात विचार प्रक्रिया व कल्पनांचा विकास हा पाया असतो. मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी चतुर्थक व्यवसायाच्या सेवा वाढत आहेत. संशोधक, विज्ञान व उच्च तंत्रज्ञान, माहिती तंत्र, वैद्यकीय क्षेत्र, अभियांत्रिकी क्षेत्र व्यवस्थापन या व्यवसायांचा समावेश चतुर्थक व्यवसायात होतो.