(३) चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षांत वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या आेळी लिहा
Answers
(३) चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षांत वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी लिहा
उत्तर :- चवदार तळ्याची घटना हा सारांश "तू झालास मूक समाजाचा नायक" या इयत्ता दहावीच्या कुमारभारती या पुस्तकातील कवितेतील असून याचे कवी ज.वि.पवार हे आहेत. कवीने या कवितेत भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या कर्तृत्वयाची महती केलेली आहे तसेच पन्नास वर्षानंतरची परिस्थिती व वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन सांगणाऱ्या कवितेच्या ओली खालील प्रमाणे आहेत.
" आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सुर्यफुले तुझा ध्यास घेतायेत
बिगुल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय."
वरील ओळीत कवी म्हणतात कि , या चवदार तळ्याच्या संग्रामाला आता पन्नास वर्षे पूर्ण झालेली आहे हे मी पुन्हा अनुभवून पाहू इच्छितो . अजूनही ज्या सूर्यफुलांनी भूतकाळात पाठ फिरवली होती ती सूर्यफूले अजून तुझा ध्यास घेत आहेत . पुन्हा एकदा संघर्ष करण्यासाठी संघर्षाला प्रवृत्त करणारे बिगुल तुझी आतुरतेने वाट बघत आहे. चवदार तळ्याचे पाणी आता गार /थंड झाले आहे, संघर्ष सुद्धा मावळला आहे.
Answer:
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""तू झालास मूक समाजाचा नायक"" या कवितेतील आहे. कवी ज. वि. पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्यावर जो सत्याग्रह केला, त्याला पन्नास वर्षे उलटल्यानंतर या महामानवाचा गौरव करणारी व त्यांना विनम्र अभिवादन करणारी ही कविता लिहिली.
★ चवदार तळ्याचे बदलाचे वर्णन.
१) सुर्यफूले ध्यास घेत आहेत.
२) बिगूल प्रतीक्षा करीत आहेत.
३) चवदार तळ्याचे पाणी थंड झाले आहे.
धन्यवाद...
"
Explanation: