(४) चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भाने तुलना करा.
Answers
(४) चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भाने तुलना करा.
उत्तर:- चवदार तळ्याची घटना हा सारांश "तू झालास मूक समाजाचा नायक" या इयत्ता दहावीच्या कुमारभारती या पुस्तकातील कवितेतील असून याचे कवी ज.वि.पवार हे आहेत. कवीने या कवितेत भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या कर्तृत्वयाची महती केलेली आहे तसेच पन्नास वर्षापूर्वीची तसेच पन्नास वर्षानंतरची परिस्थिती व वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन सांगणाऱ्या चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भाने तुलना खालील मुद्द्यांवरून करता येईल.
पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती :-
१) सुर्यफुलांनी पाठ फिरवली होती.
२) चवदार तळ्याचे पाणी पेटले होते.
३) रणशिंग फुंकले होते.
पन्नास वर्षानंतरची परिस्थिती :-
१) सूर्यफुले ध्यास घेत होती .
२) आता चवदार तळ्याचे पाणी थंड आहे.
३) आता बिगुल वाट पाहत आहे.
वरील मुद्यांवरून चवदार तळ्याचे पन्नास वर्षापूर्वीचे व पंन्नास वर्षांनंतरचे वर्णन करता येईल. डॉ.आंबेडकरांनी शोषित वर्गासाठी लढा उभारायला सुरवात केली तेव्हा सर्वदूर काळोखाचे साम्राज्य होते. दुःख, दैन्य , दारिद्र्य व सामाजिक असमानता यांच्या अंधाराने शोषित वर्ग ग्रासलेला होता. सुर्यफुलांनी पाठ फिरवली होती, चवदार तळ्याचे पाणी पेटले होते, रणशिंग फुंकले होते. अश्या या प्रतिकूल परिस्थितीत नवविचारांच्या प्रेरनांचा नवीन इतिहास घडवून आणून आतापर्यंत अन्याय सहन करणाऱ्या जनतेचा तूच खरा नायक झालास आणि दुर्लक्षित असलेल्या बहिष्कृत भारतीय समाजात नवीन जागृती आणलीस, नवचैतन्य आणलेस. सूर्यफुले ध्यास घेत होती, आता चवदार तळ्याचे पाणी थंड आहे, आता बिगुल वाट पाहत आहे. अश्याप्रकारे चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भात तुलना करता येईल.
Answer:
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""तू झालास मूक समाजाचा नायक"" या कवितेतील आहे. कवी ज. वि. पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्यावर जो सत्याग्रह केला, त्याला पन्नास वर्षे उलटल्यानंतर या महामानवाचा गौरव करणारी व त्यांना विनम्र अभिवादन करणारी ही कविता लिहिली.
★ चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भात तुलना.
◆ पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती
१) सुर्यफुलांनी पाठ फिरवली होती.
२) रणशिंग फुंकले होते.
३) चवदार तळ्याचे पाणी पेटले होते
◆ पन्नास वर्षानंतरची परिस्थिती
१) सुर्यफूले ध्यास घेत आहेत.
२) आता बिगूल वाट पाहत आहे.
३) आता चवदार तळ्याचे पाणी थंड आहे.
धन्यवाद...
"
Explanation: