छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे व कधी झाला?
Answers
Place of birth: Shivneri (.कोठे)
Date of birth: 19 February 1630 (कधी)
Answer:
:
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.
शिवनेरी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ असणारा किल्ला आहे.
राजे शहाजी यांचे पुणे जहागिरीचे गाव होते पण विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराख केले होते त्यातच उत्तर दिशेकडून मोगल बादशाह ने दख्खनवर विजय प्राप्त करण्यासाठी सैन्य पाठविले होते अशा गंभीर परिस्थितीमध्ये गर्भवती जिजाबाई यांना सुखरूप ठेवण्यासाठी राजे शहाजी यांनी शिवनेरी किल्ला निवडला. विजयराज किल्ल्याचे किल्लेदार होते.
★ अतिरिक्त माहिती :
• छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई होते. त्यांना जिजाऊ म्हणूनही ओळखले जाते.
• शिवाजी महाराजांना 'मराठा साम्राज्याचे संस्थापक' म्हणून ओळखले जाते.
• शिवाजी राजे यांना बालपणीचे शिक्षण जिजाऊ यांनी दिले. शूर पुरुषांच्या गोष्टी तसेच साधुसंताच्या चरित्रांचा आणि सद्बुद्धी च्या प्रेरणादायक गोष्टी जिजाबाई त्यांना सांगत.
• बालपणी मावळ्यांच्या मुलांसोबत शिवराय विविध खेळ खेळत असत.
• आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्म दिवशी शिवजयंती अत्यंत मोठ्या उत्साहाने साजरी करतात.