India Languages, asked by anu1600, 3 months ago

छत्रपति शिवाजी महाराज वर निबंध मराठी मध्ए ​

Answers

Answered by saisankargantayat12
3

Answer:

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध बघणार आहोत. साडेतिनशे वर्षाच्‍या गुलामगीरीच्‍या बंधनातुन मुक्‍त करून हिंदवि स्‍वराज्यात सुख आणि शांतीने जगण्‍याचा अधिकार छत्रपती शिवाजी महाराज यांनी अथक परीश्रम करून जनतेला दिला . अश्‍या या महान योध्‍याला नमन करूया आणी सुरूवात करूया निबंधाला. सुमारे साडेतीनशे वर्षांच्या प्रदीर्घ अंधाऱ्या, पारतंत्र्याने काळवंडलेल्या कालखंडानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने राजपद प्राप्त झाले. जनताशिवाज जनार्दनाने आपले तारणहार छत्रपती शिवरायांना जाणता राजा हा मानाचा खिताब बहाल केला.

महाराष्ट्र भूमीत शिवरायांनी अथक पराक्रमाने स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांनी बादशहाच्या, सुलतानाच्या मगरमिठीतून प्रजेला मुक्त केले.शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांनी त्यांची जडण-घडण केली.

सुसंस्कार, शिक्षण, युद्धशास्त्र, राजकारण न्यायशास्त्र, प्रजाहितदक्ष राज्यकारभार यात शिवराय तरबेज झाले. आणि एके दिवशी शिवरायांनी आपले सहकारी, मर्द मावळे यांच्या साहाय्याने महाराष्ट्रात स्वराज्याचे तोरण बांधले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी प्रजेला भयमुक्त केले.

Similar questions