Social Sciences, asked by LavishaJain269, 1 year ago

Chhatrapati shivaji maharaj history in marathi language

Answers

Answered by usp488
7
Hello Friends...

Here is the answer.

छत्रपती शिवाजी महाराज :
          बहमनी कालखंडाचे विघटन झाल्यावर ज्या सरदारांच्या खांद्यावर विविध शाही सुखेनैव राज्य करीत होत्या, त्यात भोसले व जाधव या घराण्यांचा समावेश होता. मालोजी राजांपासून आपणास भोसले घराण्याचा इतिहास ज्ञात आहे. मालोजीराजे निजामशाहीतील प्रमुख मनसबदारांपैकी एक होते. त्यांना शहाजी व शरीफजी ही मुले होती. शहाजी राजांचे लग्न तत्कालीन कालखंडातील मातब्बर सरदार लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाले. भातवडीच्या लढाईत पराक्रम गाजविल्यामुळे शहाजीराजांचे नाव सर्वदूर झाले. शहाजीराजे व मातु:श्री जिजाबाई यांस संभाजीराजे व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशी दोन पुत्ररत्ने झाली. संभाजीराजे लढाईत मारले गेले. निजामशाही, आदिलशाही, मुघल यांच्या संपर्कात आल्यावर शहाजीराजांना स्वतंत्र राज्य स्थापनेचे महत्त्व समजले होते. आजूबाजूची परिस्थिती, काळाचे दडपण, काही अन्य मर्यादा यांमुळे शहाजीराजांना स्वराज्य स्थापना करता आले नाही. त्यांचे स्वप्न पुत्र शिवाजींनी पूर्ण केले.

दिनांक १९ फेब्रुवारी, १६३० रोजी जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजींचा जन्म झाला. आदिलशहाने शहाजीराजांना पुणे व सुपे प्रांताची जहागिरी दिली होती. शहाजीराजे बंगळुरात राहत असल्याने जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी मातोश्री जिजाऊसाहेब, दादोजी कोंडदेव, शिवाजीराजे पुण्याला आले. शहाजी राजांनी शिवाजींच्या शिक्षणाची, लष्करी प्रशिक्षणाची व प्रशासनाच्या अभ्यासाची उत्तम व्यवस्था केली होती. शिवाजीराजांनी जहागिरीची पुनर्व्यवस्था केली. शेतीला प्राधान्य दिले. नि:पक्षपाती न्यायव्यवस्था उभारली. मातोश्री जिजाऊसाहेबांनी आपल्या मुलाच्या मनात दुर्दम्य महत्त्वाकांक्षा निर्माण केली. पुण्याच्या पश्चिमेला असणार्‍या बारा खोर्‍यांचा म्हणजे पर्यायाने बारा मावळांचा त्यांनी बंदोबस्त केला. जहागिर ताब्यात असली तरी जहागिरीतील किल्ले विजापूरकरांच्या ताब्यात होते. त्यामुळे शिवाजी राजांनी जहागिरीतील किल्ल्यांची डागडुजी केली. वयाच्या १५ व्या वर्षीच शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ‘साम-दाम-दंड-भेद’ यांचा वापर करून कोंढाणा व पुरंदर किल्ले ताब्यात घेतले. १६४७ नंतर राजांनी मुरुंबदेव उर्फ राजगड घेतला. शिवाजी महाराजांच्या हालचालींनी शंकित झालेल्या आदिलशहाने शहाजीराजांना कैद केले. शिवाजीराजांनी संभाव्य संकटाला तोंड देण्याची तयारी केली. आदिलशाहाने फत्तेखान या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठविले. मराठ्यांनी फत्तेखानाचा पुरंदरच्या परिसरात समोरासमोरच्या लढाईत पराभव केला. बंगळूर, कंदर्पी, कोंढाणा या किल्ल्यांच्या बदल्यात आदिलशाहाने शहाजीराजांची सुटका केली. या घटनाक्रमांनंतर जहागिरीची व्यवस्था राखण्याकडे शिवजीराजांनी लक्ष दिले. रांझे गावच्या बावाजी भिकाजी गुजर याने बदअंमल केला म्हणून राजांनी त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. १६४६ च्या सुमारासच राजांची मुद्रा पत्रांवर उमटू लागली.

प्रतिपश्र्चंद्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता। शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते। (अर्थ - शहाजीचा पुत्र जो शिवाजी, त्याची ही मुद्रा आहे. (शुद्ध पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे (दिवसेंदिवस) वाढत जाणारी व विश्र्वातील सर्वांना मान्य होणारी ही मुद्रा, सर्वांच्या कल्याणासाठी शोभत आहे.)

आदिलशाही दरबारातील अशांत, अस्थिर वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजींनी जावळीचे खोरे चंद्रराव मोर्‍याच्या ताब्यातून जिंकून घेतले व कोकणावरील प्रभुत्वाचा मार्ग खुला केला. प्रतापगड  बांधवून घेतला. सुपे जिंकले, रोहिडा किल्ला जिंकला. त्यानंतर कल्याणचा खजिना लुटला. रायरीच्या डोंगरावर रायगड बांधवून घेतला. १६५७ च्या सुमारास शिवाजींनी कल्याण-भिवंडी जिंकले व तेथे जहाज बांधणीचे काम सुरू करून मराठ्यांच्या आरमाराचा श्रीगणेशा केला. उत्तर व दक्षिण कोकणावर प्रभुत्व मिळविण्याच्या दृष्टीने शिवाजींच्या हालचाली चालू असतानाच आदिलशाहाने अफझलखानाची नेमणूक शिवाजींविरुद्ध केली. अफझलखान हा त्या काळातील एक पाताळयंत्री, शक्तिमान, युद्धनिपुण सरदार होता. अफझलखानाने शिवाजींविरुद्ध आक‘मण करताना पंढरपूर, तुळजापूर या धार्मिक क्षेत्रांची हानी केली. शिवाजीराजे त्याला बधले नाहीत. युक्तीने त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून राजांनी दिनांक १० नोव्हेंबर, १६५९ रोजी त्याला ठार मारले. खानाच्या मृत्यूचा विलक्षण धक्का आदिलशहाला बसला, तर शिवाजीराजांचे नाव भारतभर पसरले. अदिलशहाचा दुसरा सरदार सिद्दी जौहर याने राजांस पन्हाळ्यात कोंडीत पकडले. राजांनी विशाळगडावर युक्तीने पलायन केले. राजांस विशाळगडावर सुखरूप पोहोचण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत स्वत:च्या प्राणांचे बलिदान दिले.



Thanks to you. :-)
Answered by omegads03
5

शिवाजी भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. मुस्लिम शासनानंतर हिंदू साम्राज्याची स्थापना करणारे पहिले हिंदू होते.

शिवाजीचा जन्म 1627 मध्ये पुना येथे झाला. त्यांचे वडील शाजी भोसले जगदीर होते. ते बीजापूरच्या राजाच्या सेवेमध्ये होते.

शिवाजी बीजापुर येथे राहत होते. शिवाजींच्या शिक्षणाचा प्रभारी दादाजी नावाच्या ब्राह्मणांच्या हातात गेला.

त्यांची आई जिजा बाई अतिशय पवित्र स्त्री होती. शिवाजींना त्यांच्या पात्रतेचे उत्तम गुण मिळाले. ते कसे वाचायचे आणि लिहायचे ते शिकू शकले नाही.

पण तो सर्व प्रकारच्या मस्त खेळांमध्ये कुशल बनला. जेव्हा तो तरुण झाला तेव्हा तो सवार आणि लढाऊ आणि लढाऊ कलावंत होता.

दादाजी त्यांच्याकडे रामायण आणि महाभारत कथा वाचत असत. अशा प्रकारे जेव्हा तो तरुण होता तेव्हा देशभक्तीची आग तिच्यावर उडत होती.

हिंदूंवर मुगल राजांच्या क्रूर कृत्येच्या कथांवर त्याचा मोठा प्रभाव पडला. त्याने मुगलोंच्या क्रूर हातांपासून आपल्या देशाला मुक्त करण्याचे मन निर्माण केले. टेकड्यांच्या लहान सैन्याच्या मदतीने त्याने आपले काम सुरू केले.

त्यांनी प्रथम बीजापूर राज्यात काही किल्ले आणि जिल्हे घेतले. अखेर बीजापुरच्या राजाने त्याला ताब्यात घेण्यासाठी अफझल खान नावाचा जनरल नेमला.

अफजल खानने त्याला एका खाजगी बैठकीत मारण्याचा प्रयत्न केला, पण शिवाजी त्याच्या संरक्षणावर होते. त्याने अफझल खानला आपल्या बखनासह ठार केले आणि बीजापुर सैन्याचा नाश केला. बीजापूरच्या राजाने त्याला शांतता दिली.

आता तो औरंगजेझशी झगडायला लागला. औरंगजेब शिवाजींना अटक करण्यासाठी शास्तेता खान आणि इतर सरदारांना पाठविले.

शिवाजींनी आपल्या धाडसी सैनिकांचे लग्न केले आणि शास्ते खानच्या घरावर हल्ला केला. शाईस्ता खान बोटाच्या हानीमुळे पळून गेला.

नंतर, औरंगजेबांनी शिवाजीशी शांतता आणण्यासाठी राजा जयसिंग यांना राजा शिवजी महाराजांना आग्रा येथे येण्यास राजी केले आणि औरंगजेबशी शांतता प्रस्थापित केली, परंतु औरंगजेबने त्याला व त्याचा मुलगा अटक केली.

औरंगजेबच्या तुरुंगातून सोडल्यानंतर ते राजगढ येथे आले. त्याने मुगल सम्राट विरुद्ध युद्ध सुरू केले.

त्याने औरंगजेबला दिलेल्या किल्ल्या परत मिळवल्या. त्यानंतर 1674 मध्ये राजगढ येथे तो राजा झाला. 16 9 0 मध्ये ते पन्नास वर्षांच्या वयात मरण पावले.

तो खूप कठोर होता. तो वेदनादायक होता. त्याला राजकारणीचे ज्ञान होते. तो एक सत्य, दयाळू आणि रूढिवादी हिंदू होता.

तो एक चांगला देशभक्त होता. त्यांनी सर्व धर्मांचा आदर केला. त्यांना सर्व जातींच्या स्त्रियांबद्दल आदर होता. त्याने नेहमी गाई आणि ब्राह्मणांचे रक्षण केले. जर त्याने काही वर्षे जगले असते तर त्याने पुन्हा हिंदूंना महान केले असते. भारतावर त्याचा अभिमान आहे.

Similar questions