India Languages, asked by nazeer85, 10 months ago

coconut's autobiography in
marathi

Answers

Answered by RONITBOSE
2
नारळ माहिती
भारतात पुरातन काळापासून नैसर्गिक उपचार आणि झाडांचे उपयोग याबद्दल बहुमोल शास्त्राची परंपरा आहे. आपले वेद आणि पुराण यामध्ये झाडे आणि त्यांचे उपयोग यावर खूप संशोधन केलेले आहे. त्या दृष्टीने झाडांना देव कार्यात महत्व देऊन सामान्य जनतेला तिचा फायदा करवून दिला आहे.
नारळ हे विषुववृत्तीय आणि उष्ण कटिबंधातील मुख्यत: समुद्र किनारी आणि लगतच्या भागात वाढणारा वृक्ष आहे. हा वनस्पती शास्त्राप्रमाणे अंजियोस्पर्म वर्गात मोडणारे आणि अरेकसी कुळातील कोकोस जातीतील वृक्ष आहे. वनस्पती शास्त्राप्रमाणे याचे नाव आहे कोकोस नुसिफेरा (cocos nucifera).
भारतातून वास्को द गामा ने पहिल्यांदा हे फळ युरोपाला नेले. नारळ हे इतर फळांपेक्षा त्यातील पाण्यामुळे वेगळे फळ आहे. कोवळ्या नारळात, म्हणजेच शहाळ्यात भरपूर पाणी असते. नंतर त्याचे पाणी कमी होऊन मलईचे खोबऱ्यात रूपांतर होते.
नारळाला उष्ण हवामान साधारण २८ ते ३७ डिग्री सेल्सियस आणि थंडीत १२ डिग्री सेल्सियस लागते. भरपूर सूर्यप्रकाश आणि खूप पाऊस अंदाजे वर्षाला १५०० ते २५०० मिलीमीटर लागतो. त्याच प्रमाणे आर्द्रतेचे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत
लागते. म्हणूनच की काय नारळाची समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात लागवड होते.
नारळाचे प्रकार :
नारळाची झाडे दोन प्रकारची असतात. एक अतिशय उंच जे कोंकण किनाऱ्यावर दिसतात आणि दुसरे बुटके जे मलबारी किंवा मलेशियन जातीचे असतात, आणि ५ ते ६ वर्षांत फळे देतात. नारळाची पाने ४ ते ६ मीटर लांब असतात आणि अणकुचीदार असतात.
नारळाच्या फळाचे ३ विभाग असतात - शेंड्या, कवटी आणि खोबरे (exocarp, mesocarp, endocarp). नारळाची मुळे तंतुमय आणि वाढणारी असतात. झाडाला फुलांचा गुच्छ येतो. त्यात स्त्री पुष्प आणि पुरुष पुष्प एकाच गुच्छात असतात. त्यामुळे परागीभवन त्यातच होते.
भारतात नारळ सर्वात जास्त केरळ राज्यात पिकतो. पण तामिळनाडुचे नारळ गुणांनी त्याच्यापेक्षा चांगले असतात. केरळ व तामिळनाडुच्या व्यतिरिक्त आंध्रप्रदेश, कर्नाटक,पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि गोवा या ठिकाणी सुद्धा नारळ पिकतात. तीन बाजूने समुद्राने वेढलेला असल्यामुळे भारत नारळ उत्पादनात जगात तिसरा आहे.
Answered by chahatsajnanai
1

माड किंवा नारळ श्रीफळ(शास्त्रीय नाव: Cocos nucifera, कोकोस नुसिफेरा ; इंग्लिश: Coconut, कोकोनट ;) हा विषुववृत्तीय व उष्णकटिंबंधीय प्रदेशांत मुख्यत्वे समुद्रकिनारे आणि लगतच्या भागात वाढणारा, ताड कुळातील एक वॄक्ष आहे. याचे फळ नारळ या नावाने ओळखले जाते. सुमारे ३० मीटर उंचीच्या या वॄक्षाला ४-६ मीटर लांबीची झावळ्यांच्या स्वरूपातील पाने फुटतात. माडाला, वर्षातल्या दर महिन्यात फुलांचा एक तुरा लागतो. तुर्‍यातील मादी फुलांना लागलेली फळे अकरा ते बारा महिन्यांत पक्व होतात. म्हणजेच प्रत्येक महिन्यात प्रत्येक झाडावरून एक घड काढायला मिळतो. या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा काही ना काही उपयोग आहे, म्हणून या झाडाला कोकणात कल्पवृक्ष मानतात.

Similar questions