India Languages, asked by chiefpekka95, 1 year ago

Composition on 'मी शिशक जालो तर'.

Answers

Answered by iTxDyNaMiTe
3
आमच्या शाळेच्या पर्यवेक्षिका व आम्हा दहावीच्या वर्गशिक्षिका पाटील टीचर, आम्ही एका ऑफ पिरियडला दंगा व कल्लोळ करत असता वर्गात आल्या. आमच्यातील बहुतेकांचा तर असा समज झाला की, त्या इतिहास शिकवायला आल्या, त्यामुळे सगळ्यांचा मूड उतरला होता. परंतु त्यांनी लगेच सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितले की, आपण शाळेत दरवषीर्प्रमाणे यंदाही शिक्षक दिनाचा कार्यक्रम करणार आहोत.

मी एखाद्या वर्गात 'शिक्षक' बनून जाणार! याचा मला खूप आनंद तर झालाच पण वर्गात गेल्यावर मुले आपल्यासोबत कशी वागतील, ही मोठी शंका मनात कुठेतरी घर करून बसली. सगळ्या विद्यार्थ्यांनी वर्ग निवडले. मीही तिसरीच्या वर्गावर इतिहास व सातवीवर मराठी विषय घेतला होता. पण कोणीही नववीवर


जाण्याची हिंमत न केल्यामुळे मी सातवीवरचा मराठी वगळून नववीवर भूमिती शिकवण्याचे ठरवले. माझ्यानंतर इतर मुलांनीही नववीच्या वर्गावर शिकवण्यास उत्सुकता दाखवली.
त्या दिवसापासून 'शिक्षक दिन' साजरा करण्याबाबत आमची चर्चा सुरू झाली. त्या दिवशी काय करायचे, कशी तयारी करायची, विद्यार्थ्यांना विषय कसा समजावून द्यायचा याची स्वप्ने रंगवणे सुरू झाले आणि तो दिवस उगवला. सकाळी शाळेत आल्या आल्या माझ्या मित्रांनी सांगितले की, तुझा पहिला पिरियड नववीवर आहे. हा आश्चर्याचा धक्का बसतो न बसतो तोच पाटील टीचर लिस्ट घेऊन आल्यावर ही गोष्ट खरी असल्याचे समजले. मी नववीच्या वर्गात थोडा घाबरतच शिरलो. त्या मुलांनी मी येताच माझे 'गुड मॉनिर्ंग, सर' असे स्वागत केले. माझा हा अविस्मरणीय असा क्षण आहे. कारण मला पहिल्यांदाच कोणी 'सर' म्हटले चला... जीवनात कधीतरी मी सर झालोच!

तिसरीवर माझा पाचवा पिरियड होता. त्यांना मी त्यांच्या वयात शिरून शिकवण्याचा प्रयत्न केला. मी अंतराळातल्या चंद आणि आपल्या पृथ्वीपासून सुरुवात केली, ती पायी चढत आपल्या आजच्या प्रगत मानवापर्यंत. त्यांचा प्रवास घडवला. त्या मुलांच्या सहवासात तो पिरियड कसा संपला ते कळलेच नाही. त्यानंतर हा अनुभव आम्ही शिक्षकांसोबत शेअर केला. खरंच. हा शिक्षक दिन माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला!



i dont this language ...

so i copied it from goggle... ^_^


hope it will help u>_<
Similar questions