Corona che Parinaam essay in marathi.
Answers
Answer:
सध्या जगभरात कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले आहे. या साथीत जगभरात आतापर्यंत २८,७३५ इतके मृत्यू झाले आहेत. या साथीपुढे जगातील बलशाली सत्ता देखील हतबल झालेल्या दिसत आहेत. अगदी सूक्ष्म स्वरूपातील या विषाणूने परिस्थिती चिंताजनक केली आहे. या साथीच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरातील मानवी समूहाला ‘जिवंत राहणे’ हीच आपली प्राथमिकता आहे हे अधोरेखित करायला भाग पाडले आहे. साथीच्या प्रकारातील या विषाणूचा प्रादूर्भाव जगभरातील अनेक श्रीमंतापासून ते गरीबापर्यंत होतोय. जोपर्यंत या विषाणूचे स्वरूप, त्याचा प्रसार आणि व्याप्ती याचा ताळेबंद घालायच्या आताच या विषाणूने व्यस्त प्रमाणात पसरायला सुरुवात केलेली आहे. अजूनतरी या आजारावर लस बनवण्यात विषाणू शास्त्रज्ञांना यश आलेले नाही. भारतात देखील कोरोनाची साथ पसरत आहे. भारतात आजच्या घडीला ८७३ केसेस (सरकारी आकड्यानुसार) निदर्शनास आल्या आहेत. मृत्यू १७ झाले आहेत. यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत.गेल्या २४ मार्चला रात्री ८च्या सुमारास देशाला संबोधित करताना २१ दिवसांच्या (१४ एप्रिल पर्यंतची) संचारबंदीची घोषणा पंतप्रधानांनी केली. त्या आधी त्यांनी २२ मार्च रोजी एक दिवसाचा ‘जनता कर्फ्यु’ पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बरेच कर्तव्यदक्ष लोक अहोरात्र आपल्या जीवाची परवा न करता सेवा देत आहेत. या लोकांप्रती सामजिक कृतज्ञता म्हणून टाळ्या/थाळ्या/शंख इत्यादी आपल्या गॅलरीमधून किंवा घरातून वाजवून या सर्व लोकांचे आभार पंतप्रधानांनी प्रदर्शित करायला सांगितले होते. देशातील काही भागातील लोकांनी कर्फ्यूचे गांभीर्याने पालन केले नाही. उलट कर्फ्यूला थोडं कंटाळतच पाच वाजवले आणि आपली सामाजिक कृतज्ञता व्यक्त करायला सुरवात केली. यामध्ये काही जण ढोल-ताशा, फटाके घेऊन रस्त्यावर/चौकात पोहोचले. या सर्व गोष्टींचा अनुक्रम आपल्या सर्वांना माहीत आहे. अशा अवघड परिस्थितीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाच्या विरुद्ध लढायला पाहिजे. ही वेळ लिखाणातून चुका दाखवण्याची नाही. या लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाने घरी बसून आपले सहकार्य शासकीय यंत्रणांना दिले पाहिजे. तरीदेखील पंतप्रधानांच्या भाषणांनंतर काही प्रश्न सतत मनात घोळत राहतायत त्या संदर्भाने मी इथे उहापोह करणार आहे.तर भाषणात २१ दिवसांची बंदी झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी किराणामाल/ दैनंदिन गोष्टीसाठी गर्दी झाल्याची पाहायला मिळाली. पुढचे किमान २१ दिवस घरातून बाहेर जाता येणार नसल्यामुळे बऱ्याच लोकांनी सामाजिक अंतराचे भान न ठेवता कोरोना संसर्गाचा धोका पत्करून खरेदीला बाहेर पडण्याचे ठरवले. जवळच्या किराणा दुकान आणि मॉलमध्ये गर्दी केली. दुसरीकडे सामाजिक माध्यमांवर कर्फ्युचे उल्लंघन केल्यानंतर पोलिसांची लाठी खाल्लेल्या लोकांचे व्हिडीओ देशभरातून फिरत आहेत. आता मुद्दा खरतर इथून सुरू होतो की, इतक्या भयंकर संसर्गजन्य आजाराची स्थिती गंभीर होण्याची चिन्हे असताना पंतप्रधान बरोबर रात्री आठ वाजताच देशातील नागरिकांशी संवाद का साधतात? त्या रात्री ८च्या भाषणात ते सांगतात की, त्याच दिवशीच्या रात्रीच्या १२ वाजतापासून २१ दिवसांचा लॉकडाऊन पूर्ण देशात लागू करण्यात येत आहे. याचा अर्थ संपूर्ण देश बंद. कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाऊन हा चांगला निर्णय आहे. या लॉकडाऊनमुळे विशिष्ट सामाजिक अंतर राखलं जाईल आणि या आजाराचा जास्त प्रसार होणार नाही. त्याला या मार्गाने लवकर थांबता येईल. हे खरे असले तरी पंतप्रधानांची २१ दिवस देश बंद करण्याची घोषणा रात्री ८ वाजता करणे चुकीचे होते. पंतप्रधान नेहमी एकतर्फी भाषण करतात. यामुळे बऱ्याचदा त्यांच्या भाषणांतून विषयावर अर्धवट मार्गदर्शन होते. त्यामुळे संभ्रम निर्माण होतात आणि लोकं जे सांगितले आहे त्यापेक्षा काही काकणभर अधिक कृती करतात. याची प्रचिती जनता कर्फ्यूच्या दिवशी पाहायला मिळाली.भारतामध्ये सत्तेत असणाऱ्या पक्षाला किमान भारताची ओळख आहे असे आपण समजतो. त्यानुसार भारतात आजच्या घडीला बहुसंख्य लोकांमध्ये गरीब, मजूरवर्ग, निम्न मध्यमवर्ग आणि मध्यमवर्ग मोठ्या संख्येने असताना २१ दिवस लॉकडाऊनचा निर्णय देशातील लोकांना विश्वासात न घेता घेतला गेला. याचे परिणाम येणाऱ्या काळात विविध स्तरातून पाहायला मिळतील. भारतीय समाजात अस्तित्वात असणारी विषमता कोरोनामुळे अजून गडद होताना दिसेल. असे होताना रुग्णांना मिळणाऱ्या सोयींपासून ते किराणामाल आणि जीवनावश्यक गोष्टींसाठी येणाऱ्या काळात विविध पातळ्यांवरील प्राधान्यक्रम नाकारता येणार नाहीत.सध्या काही ठिकाणी हा आजार पसरत आहे. तिथे एका विशिष्ट धर्माला कारणीभूत मानले जात आहे. त्यामुळे धार्मिक तेढ वाढण्याची देखील शक्यता आहे. देशातील बऱ्याच भागांसोबत आदिवासी भागात देखील शहरातून येणाऱ्या लोकांना गावात प्रवेश दिला जात नाहीये. प्रवेश रोखण्यासाठी गावाच्या वेशीवर झाडे/काटे/ दगड टाकण्यात आलेले आहेत. आदिवासी भागात अंधश्रद्धा या पूर्वीपासून आहेत. त्यामध्ये भगता (गावचा पुजारी) तर्फे असेल किंवा इतर कोणी बाबाच्या सांगण्यावरून एखाद्या संकटातून वाचण्यासाठी बळी देणे, एखाद्या व्यक्तीला संशयावरून गावाबाहेर काढण्याचा प्रकार होतात. या आजाराच्या बाबतीत देखील उलट सुलट चर्चांमुळे काही भागात असे प्रकार आढळून आले आहेत. यावर उपाय म्हणून स्वयंसेवी संस्थांकडून आणि शासनाकडून या भागामध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे.सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची असणारी स्थिती आणि कोरोनाच संकट अत्यंत बिकट परिस्थितीला जन्म घालेल. आपल्या देशातील एकूणच वैज्ञानिक दृष्टीकोनाबद्दल अनास्था आहे. लोकांना नेहमी वाटत राहते की काहीतरी जादू होईल किंवा चमत्कार होईल आणि सर्व ठीक होईल. यावर ते विश्वास ठेवतात. याचा प्रत्यय २२ मार्चच्या जनता कर्फ्यूच्या दिवशी आलाच
Answer:
कोरोना विषाणू लगेचच जागतिक साथ ठरेल असं नाही, पण देशांनी त्यासाठी तयार रहावं असं WHO ने म्हटलंय.
यातील बहुतांश संसर्ग चीनमध्ये झाला असला, तरी दक्षिण कोरिया, इटली आणि इराण यांसारखी इतर राष्ट्रही या विषाणूशी झगडत आहेत. या विषाणूमुळे 'कोव्हिड-19' हा श्वसनविकार होतो.
कोरोना विषाणूमुळे बळावतोय 'सायनोफोबिया'
कोरोना विषाणूने घेतला अनेक नामवंतांचा बळी
एखादा संसर्गजन्य रोग जगातील विविध भागांमध्ये व्यक्ती-व्यक्ती स्तरावर सहजरित्या पसरू लागतो तेव्हा जागतिक साथ पसरल्याचं म्हटलं जात
चीनमध्ये गेल्या वर्षी हा विषाणू उद्भवला आणि तिथे आत्तापर्यंत सुमारे 77 हजार लोकांना याची लागण झाली असून जवळपास 2600 लोकांचा या आजारात मृत्यू झाला आहे.
कोव्हिड-19ने मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचं प्रमाण एक टक्क्यापासून दोन टक्क्यांपर्यंत असल्याचं दिसत असलं, तरी प्रत्यक्षातील मृत्युदर अजून समजलेला नाही, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
इराक, अफगाणिस्तान, कुवेत आणि बहारीन या देशांमध्येही कोरोना विषाणूची लागण झालेले पहिले रुग्ण सोमवारी आढळले; हे सर्व लोक इराणहून आले होते.
या विषाणूला आळा घालण्याची संधी 'अंधुक' होत चालली आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख तेद्रोस अदहानम घेब्रेयेसस यांनी
'जागतिक साथ थोपवण्याची आपली क्षमता गेल्या 24 तासानंतर कमीकमी होऊ लागली असून जागतिक साथ पसरण्याचा टप्पा जवळ आल्याचं दिसतं आहे,' असं ते सोमवारी म्हणाले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस बीबीसीशी बोलताना म्हणाल्या की, हा विषाणू अधिक दूरपर्यंत पसरण्यापासून रोखण्याचा प्रयत्न देश करत आहेत, त्यामुळे सध्या तरी या परिस्थितीकडे जागतिक साथ म्हणून पाहिलं जात नाहीये.
"विविध देशांनी काहीच उपाय केले नसते, तर याहून कितीतरी अधिक पटींनी रुग्ण आपल्याला आढळले असते," असं त्या म्हणाल्या. "रोगप्रसार थोपवणं म्हणजे हेच."
कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि आपण काळजी काय घ्यायची?
ताप आणि खोकला, त्याचप्रमाणे पुरेशी हवा श्वसनावाटे आत घेता न येणं आणि श्वासोच्छवासामध्ये येणाऱ्या अडचणी, ही या संसर्गाची मुख्य चिन्हं आहेत.
कोरोना व्हायरसापासून बचावासाठी आपण काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी साबणाने किंवा जेलने वारंवार हात धुवावेत, आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळावा आणि स्वतःचे डोळे, नाक आणि तोंड यांना न धुतलेल्या हातांनी स्पर्श करू नये. ही काळजी घेतल्यास संसर्गाचा धोका कमी होतो.
दक्षिण कोरिया, इराण आणि इटली इथली एकत्रित परिस्थिती पाहिली असता जागतिक साथीचे सुरुवातीचे टप्पे सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. जगाच्या विविध भागांमधील समुदायांत कोरोना विषाणू पसरण्याचे, जागतिक उद्रेकाचे हे संकेत आहेत.
यातील प्रत्येक देशामध्ये चीनशी संबंध न येताही विषाणू पसरत असल्याचं दिसतं आहे. इटलीमध्ये प्रसाराला आळा घालण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न चीनशी साधर्म्य सांगणारे आहेत.
विशेषतः इराणमधील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे, कारण तिथल्या आरोग्य प्रशासनाने म्हटल्यानुसार, देशातील अनेक शहरांमध्ये हा विषाणू पसरला आहे, आणि लेबनॉनमधील पहिला रुग्ण इराणमधून आलेला प्रवासी असल्याचं समोर आलं आहे.
हिवाळ्याच्या अखेरपर्यंत देशांना हा विषाणू थोडाफार थोपवता आला, तर नंतरच्या उष्ण हवामानामुळे विषाणू हवेत टिकून राहण्याचा कालावधी कमी होण्याची आशा निर्माण होईल. मोसमी फ्लूच्या बाबतीत असंच होतं. पण हे ठामपणे सांगता येणार नाही.
सर्वांत गंभीर फटका बसलेले देश कोणते?
दक्षिण कोरिया - चीनव्यतिरिक्त या विषाणूची लागण झालेले सर्वाधिक रुग्ण दक्षिण कोरियात आढळले आहेत. सोमवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार दक्षिण कोरियात आणखी 231 लोकांना याची लागण झाली असून तिथल्या एकूण रुग्णांची संख्या 830 च्या पुढे गेली आहे. आठ लोकांचा मृत्यू झाला आहे.
सैन्यातील 11 सदस्यांना हा संसर्ग झाल्यानंतर सुमारे 7,700 जवानांना वेगळं ठेवण्यात आलं आहे.
पण विषाणूचा सर्वाधिक प्रसार झालेले समूह आग्नेयेकडील दाइगू शहरातील एका रुग्णालयाशी आणि धार्मिक गटाशी संबंधित आ
काही दक्षिण कोरियन विमान कंपन्यांनी दाइगूच्या दिशेने होणारी विमान वाहतूक थांबवली आहे. या शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाख इतकी आहे.
वाहतुकीचं निलंबन 27 मार्चपर्यंत सुरू राहील, असं 'कोरियन एअर' कंपनीने जाहीर केलं आहे.
इटली - युरोपातील सर्वाधिक 165 कोरोनाग्रस्त रुग्ण इटलीमध्ये आहेत आणि या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी गेल्या आठवडाअखेरीला मोठ्या प्रमाणावर उपाय जाहीर करण्यात आले.
लॉम्बार्डी आणि व्हेनेटो या प्रांतांमध्ये अनेक छोट्या शहरांना बंदिस्त करण्यात आलं आहे. पुढील दोन आठवडे इथल्या ५०,००० रहिवाशांना विशेष परवानगीविना शहराबाहेर पडता येणार नाही.
दरम्यान, चीनमध्ये या विषाणूचा उद्भव सुरू झाला त्या वुहान शहराच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी जाहीर केलं की, काही अनिवासी व्यक्तींमध्ये या रोगाची लक्षणं दिसत नसतील, तर त्यांना शहर सोडण्याची मुभा दिली जाईल.
परंतु, हा आदेश शासकीय शिक्कामोर्तब घेऊन काढलेला नव्हता, त्यामुळे आता तो मागे घेण्यात आला आहे, असं प्रशासकीय अधिकारांनी नंतर सांगितलं.
इराणने सोमवारी जाहीर केल्यानुसार, तिथे या विषाणूची लागण झालेले 43 रुग्ण आहेत. यातील बहुतांश लोक कौम या धार्मिक महत्त्व असलेल्या शहरातील आहेत. विषाणूची लागण झालेल्यांपैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या रोगाने मृत्युमुखी पडलेल्यांचा हा चीनबाहेरचा सर्वांत मोठा आकडा आहे.
विषाणूच्या फैलावाची व्याप्ती लपवून ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप कौममधील खासदाराने केला आहे. केवळ या शहरातच 50 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं ते म्हणाले. परंतु, देशाच्या उप-आरोग्य मंत्र्यांनी हा दावा तत्काळ फेटाळून लावला.
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी उत्तर कोरियाने 380 परदेशी व्यक्तींना वेगळं ठेवलं