India Languages, asked by bipinsingh8324, 3 months ago

corona kadatil sikshan essay​

Answers

Answered by ifxhn
0

Answer:

कोरोनानंतरच्या जगात मुलांच्या शिक्षणाचे मार्गही बदलतील?

सध्या अस्तित्वात असलेली शैक्षणिक धोरणं बदलण्याची गरज असल्याचं, असं फोनवरील मुलाखतीदरम्यान बेनीवाल यांनी बीबीसीला सांगितलं.

"मी लंडनमध्ये जास्तीत जास्त 10 विद्यार्थ्यांचा 'झूम'वर क्लास घेते. इथं बहुतेक विद्यार्थ्यांना स्वत:ची खोली असते,

तसंच त्यांच्याकडे लॅपटॉप किंवा टॅबलेट्स असतात. यांतील बहुतेक मुलं ही तंत्रस्नेही असतात."

आता दिल्लीत अनेक शाळा आणि विद्यापीठांनी ऑनलाईन शिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांचा याबाबतचा अनुभव वेगवेगळा आहे.

कोरोना

वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?

वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?

वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?

वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?

वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

लाईन

"अनेक ठिकाणी ऑनलाईनकडे वळतं होणं आमच्यासाठी सोपं ठरलं. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर लगेच आम्ही ऑनलाईनकडे वळालो. जवळपास सगळे वर्ग गुगल मीट किंवा झूमवर घेतले जात होते," दिल्लीतल्या अशोका यूनिव्हर्सिटीतील प्राध्यापक सैकत मजूमदार सांगतात.

"पण, असं असलं तरी विद्यापाठीत काही विद्यार्थी असे आहेत, ज्यांना इंटरनेट कनेक्शनविषयी समस्या आहेत. यामध्ये काश्मीर आणि इतर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा सामावेश आहे."

देशातील अनेक खासगी शाळांनी आता झूम अॅपवर वर्ग घेण्यास सुरुवात केली आहे. पण, ही फक्त तात्पुरती सोय आहे, असं अनेक पालकांचं म्हणणं आहे.

नाव न छापण्याच्या अटीवर एका दोन मुलांच्या पालकानं बीबीसीला सांगितलं, "माझे दोन्ही मुलं नियमितपणे झूमवरच्या शिकवणी वर्गाला हजेरी लावतात. पण, ऑनलाईन शिक्षणाच्या अनुभवाची गुणवत्ता ही ठीक आहे. शिक्षकाला विद्यार्थ्याशी वन-टू-वन संवाद साधायला इथं मर्यादा येते."

याशिवाय कॅम्पस एक्सपरियन्सची संकल्पना कोरोनामुळे पूर्णपणे बदलल्याचं विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं.

"आमचं पुढचं सत्र ऑनलाईन होण्याची दाट शक्यता आहे. आम्ही विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अभ्यासक्रम देत आहोत. पण, असं असलं तरी काही प्रमाणात हे काम आव्हानात्मक असणार आहे," सैकत सांगतात.

एकदा लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा कशा पद्धतीनं शाळा आणि विद्यापीठांनी सुरुवात करावी हा सुद्धा प्रश्न आहे. सोशल डिस्टन्सिंग हा महत्त्वाचा मुद्दा आणि ज्या पद्धतीनं यूरोप, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आल्या आहेत, त्यातून बोध घेता येऊ शकतो.

काही शाळांनी विद्यार्थ्यांमध्ये ग्लास शीट वापरली आहे. काहींनी विद्यार्थ्यी शाळेच्या इमारतीत शिरल्यानंतर त्यांचं तापमान तपासणं अनिवार्य केलं आहे. पण, असं असलं तरी भारतासारख्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वैविध्य असलेल्या देशात शिक्षणाचं भविष्य विद्यार्थ्यांनुसार बदलण्याची शक्यता आहे.

Similar questions