India Languages, asked by sharmanaman3916, 5 months ago

Coronachya kalat mobile shaap ki vardaan nibandh short.

Answers

Answered by gargee2760
1

Answer:

माणसाने लावलेल्या अनेक शोधांमध्ये स्‍मार्टफोन म्हणजेच मोबाईलचा शोध हा सर्वांत महान शोध म्हणावा लागेल. पुराणकथेतील वामनाने साडेतीन पावलांमध्ये सर्व विश्व पादाक्रांत केल्याचे सांगितले जाते. पण मोबाईलच्या इवल्याशा उपकरणाने एका पावलात अक्षरशः संपूर्ण जग पादाक्रांत केले आहे. आज श्रीमंतांपासून ते गरीबलोकांपर्यंत अक्षरशः सर्वांच्या खिशात हा मोबाईल असतो. या मोबाईलशिवाय हल्ली कोणाचे पानही हलत नाही.

या मोबाईलने अल्पावधीतच आपले प्रताप दाखवायला सुरुवात केली आहे. सर्व लोक या मोबाईलच्या पूर्णपणे आहारी गेले आहेत. कोठेही जा, लोक मोबाईलवरून कोणाशी ना कोणाशी तरी सतत बोलत असतात. गाडीतून उतरल्यावर, रस्त्याने चालताना, गाडी चालवताना, इतकेच नव्हे, तर घरी आल्यावरही सतत कोणाशी तरी बोलत असतात. सतत बोलण्यात गुंतल्यामुळे बोलणाऱ्याचे भोवताली लक्षच नसते. यामुळे अनेकदा अपघात होतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बोलणाऱ्याचे भोवतालच्या माणसांकडे लक्ष नसते.

आपली मित्रमंडळी, नातेवाईक, घरातील माणसे यांच्याशी जिवाभावाच्या दोन गोष्टी बोलणे दुरापास्त झाले आहे. यामुळे माणूस भावनिकदृष्ट्या इतर व्यक्तींपासून दुरावत चालला आहे. एक प्रकारचा दुरावा निर्माण होत आहे. व्यक्तीला निवांतपणे स्वत:कडेही पाहायला वेळ राहिलेला नाही. आजकाल मोबाईलमध्‍ये गेम खेळने नेहमीची गोष्‍ट झाली आहे. त्‍यातच PUBG (Player Unknown's Battle grounds.) या गेमने धुमाकुळ घातला आहे. मुले तहान भुक विसरून हा गेम खेळतात त्‍यामुळे त्‍यांंच्‍या अभ्‍यासाकडे व आरोग्‍याकडे दुर्लक्ष होते.

Similar questions