India Languages, asked by wwwsunildevtalu, 10 months ago

coronavirus essay in Marathi​

Answers

Answered by Iraus
7

Explanation:

आपण श्वसनाच्या आजाराने आजारी असल्यामुळे इतरांना आपल्यामुळे लागण लागणार नाही याची जबाबदारी तुमच्यावर जास्त आहे.

आजारी लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आपण स्वत: आजारी असाल तर इतरांपासून दूरच राहा, रुमालात किंवा आपल्या बाहीमध्ये खोका, शिंका. रुमाल कपडे वरचेवर बदला, स्वच्छ ठेवा. स्वतंत्र खोलीत राहा. तसे केलेत तर सतत फेसमास्क वापरला नाहीत तरी चालेल. आपल्या समोर कोणी आल्यास मात्र नाक-तोंड झाकून घ्या. आपण श्वसनाच्या आजाराने आजारी असल्यामुळे इतरांना आपल्यामुळे लागण लागणार नाही याची जबाबदारी तुमच्यावर जास्त आहे. आपण क्लिनिकच्या प्रतीक्षालयासारख्या ठिकाणी गेल्यावर फेसमास्क घातल्यास आपण आपला आजार इतरांपर्यंत पसरवणे टाळू शकता.

कोविड -१९ चा उपचार कसा केला जातो?

कोविड -१९ साठी सध्या अधिकृतपणे मंजूर असे औषध नाही. या विषाणूची लागण झालेल्या लोकांमध्ये असलेली लक्षणे दूर करण्यासाठी विश्रांती, द्रवरूप आहार आणि तापाचे नियंत्रण यासारखी सहायक काळजी घ्यावी. खोकला शमवणारी औषधे, ताप नियंत्रित करणारी औषधे, विश्रांती देणारी औषधे अशी रोग्याच्या लक्षणांप्रमाणे आवश्यक वाटणारी नेहमीची औषधे देण्यात येतात. गंभीर प्रकरणांत, महत्त्वपूर्ण अवयवांचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी काळजी घेणारे उपचार करणे आवश्यक ठरते.

1 आपले हात साबणाने आणि पाण्याने कमीतकमी १५-२० सेकंद धुवा. जर साबण आणि पाणी उपलब्ध नसेल, तर कमीतकमी ६०% अल्कोहोल असलेले हँड सॅनिटायझर वापरा.

2 आपले डोळे, नाक आणि तोंड यांना न धुतलेल्या हातांनी स्पर्श करणे टाळा. आजारी असलेल्या लोकांशी जवळचा १ मीटरच्या आतला संपर्क टाळा.

3 आपण स्वत:च आजारी असलात

तर घरीच राहा.

4 खोकताना किंवा शिंकताना रुमालाने, टिश्यूने तोंड झाकून मग तो टिश्यू कचरापेटीत टाका. त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावा.

5 वारंवार स्पर्श केल्या जाणाऱ्या वस्तू आणि पृष्ठभाग यांची स्वच्छता आणि नेहमीचे घरगुती क्लिन्झर वापरून निर्जंतुकीकरण करणे हा प्रभावी मार्ग आहे.

6 सध्या फ्लू आणि श्वसन रोगाचा हंगाम आहे आणि सूक्ष्मजंतूंचा प्रसार रोखण्यासाठी नियमित प्रतिबंधक कृती करणे योग्य ठरेल तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेली असल्यास ती औषधे घेत राहायला पाहिजेत.

Similar questions