Covid-19 च्या काळात online classes नसते तर .........
plz plz answer this question
I promise I will give him/her free point
many more thanks and also follow him/her
Answers
Answer:
कोविड-१९ विषाणूमुळे जगभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला आणि विद्यार्थाना कोरोनाची लागण होऊ नये, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शाळा बंद करण्यात आल्या. परीक्षा रद्द करण्यात आल्या. कोरोनामुळे जगातील १८८ देशातील १.५ अब्जपेक्षा अधिक, जवळपास ९१% विद्यार्थ्यांची शाळा बंद झाली. शाळा बंद झाली असली तरी शिक्षण सुरू राहिले पाहिजे, यासाठी सर्वच देशात ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचे सुरू केले आहे.महाराष्ट्र राज्यात शाळा ऑनलाइन भरणार असा निर्णय सरकारकडून घेण्यात नुकताच घेण्यात आला आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्फत दिनांक २८ एप्रिल २०२० रोजी (शासन परिपत्रक क्रमांक : २०२० /प्र.क्रं.८४/ एसडी-६) कोविड-१९ या विषाणूजन्य साथीच्या रोगामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू राहण्यासाठी ‘लर्निंग फ्रॉम होम’ ही संकल्पना राबविण्याबाबत परिपत्रक काढण्यात आले.घरी राहून शिक्षण ही संकल्पना राबविण्यासाठी राज्य सरकारने काही संसाधनाची माहिती उपलब्ध करून दिली आहे. यासाठी राज्य सरकारने प्रत्येक शिक्षक व विद्यार्थी यांना मोफत आणि मुबलक प्रमाणात ई-लर्निंग साहित्य मिळावे म्हणून केंद्र शासन मनुष्यबळ संसाधन विभाग (MHRD) आणि महाराष्ट्र शासनाचे DIKSHA ई लर्निंग फ्लॅटफॉर्म सुरू केले आहे. DIKSHA वर सद्य: स्थितीमध्ये इयत्ता पहिली ते १०वी साठी मराठी, हिन्दी, इंग्रजी व उर्दू भाषेमधील ९००० पेक्षा अधिक ई लर्निंग साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावर प्रामुख्याने इंटरॅक्टिव व्हिडिओ, संकल्पनेवर आधारित व्हिडिओ, उपक्रमावर आधारित व्हिडिओ, बौद्धिक स्वरुपातील खेळ, विविध वर्कशीट, इंटरॅक्टिव प्रश्नपेढी इत्यादीचा समावेश आहे.महाराष्ट्रातील शिक्षकांनी देखील DIKSHA वरील ईसाहित्याची निर्मिती केली आहे. या माध्यमातून मुले घरबसल्या शिक्षण घेऊन शकतात.इयत्ता पहिली ते दहावीचे DIKSHA मोबाईल अॅप, इयत्ता पहिली ते दहावीचे DIKSHA वेब पोर्टेल, क्रिएटिव्ह आणि क्रिटीकल थिंकिंग (सीसीटी) प्रश्न, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, ऑनलाइन पाठ्यपुस्तके, ई-बालभारती, बोलकी बालभारती, इयत्ता आठवी ते दहावी विज्ञान, भूगोल,संस्कृत विषयाचे व्हिडिओ स्वरुपातील साहित्य, बालभारती यूट्यूब वाहिनी, पाठ्यपुस्तक मंडळाचे ई-बालभारती अॅप, किशोर मासिक, अवांतर वाचनासाठी वेबसाईट्स व अॅप्लिकेशन यात नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियावरील पुस्तके, बोलो वाचनासाठीचे मोबाइल अॅप्लिकेशन, एनसीईआरटी मार्फत इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विषयासाठी ई-साहित्य संग्रह, ई-पाठशाळा, SWAYAM, SWAYAM PRABHA, PODCAST गुगल क्लासरूम असे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.लॉकडाऊनमुळे देशातील नव्हे तर जगभरातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यंदा ज्या मुलांनी दहावी किंवा बारावीत प्रवेश केला आहे. त्या मुलांच्या पालकांमध्ये आपल्या मुलाच्या भवितव्याची चिंता सुरू झाली आहे. यासाठी राज्य सरकारच्यावतीने शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके ऑनलाइन उपलब्धही करून देण्यात आली आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी उपलब्ध असलेले विविध अॅपवरही लॉकडाऊनच्या काळात मुलांकडून अभ्यास करवून घेतला जात आहे.लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्यातरी शिक्षण सुरू असे ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे वाटत असले तरी भारतासारख्या देशात हा पर्याय सगळ्याच मुलांसाठी लागू होऊ शकत नाही. राज्य घटनेत ६ ते १४ वर्ष वयोगटातील बालकांसाठी सक्तीचे शिक्षण दिले जावे, अशी घटनात्मक तरतूद असली तरीही आज अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. अति दुर्गमभागात आजही एक किंवा दोन शिक्षकांवर शाळा चालविली जाते. ज्यात गावांमध्ये धड रस्ते नाही, वीजेची पुरेशी सोय नाही, एका गावात पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे तर पाचवी ते सातवीचे शिक्षण घेण्यासाठी दुसर्या गावात किमान तीन ते चार किलोमीटर जावे लागते आणि सातवीच्या पुढचे शिक्षण घेण्यासाठी तालुका गाठावा लागतो. गावातून पहिली बस चुकली तर एक दिवसाची शाळा बुडते, मुलींसाठी जानेवारीच्या अखेरीस गावात पाण्याचा तुटवडा असतो म्हणून पाणी भरण्यासाठी शाळा बुडवावी लागते. तर शाळेत स्वच्छतागृह नाहीत असले त्याठिकाणी पाण्याची सोय