Hindi, asked by TejasTayade, 9 months ago

covid-19 या आजारांवरील प्रतिबंधात्मक उपयोजना व माझी जबाबदारी.(निबंध)​

Answers

Answered by srilathajoshi1986
1

Answer:

can you please translate into English so I can help you

Answered by TrishaNikhilJaiswal
6

Answer:

सध्या जगभरात कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले आहे. या साथीत जगभरात आतापर्यंत २८,७३५ इतके मृत्यू झाले आहेत. या साथीपुढे जगातील बलशाली सत्ता देखील हतबल झालेल्या दिसत आहेत. अगदी सूक्ष्म स्वरूपातील या विषाणूने परिस्थिती चिंताजनक केली आहे. या साथीच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरातील मानवी समूहाला ‘जिवंत राहणे’ हीच आपली प्राथमिकता आहे हे अधोरेखित करायला भाग पाडले आहे. साथीच्या प्रकारातील या विषाणूचा प्रादूर्भाव जगभरातील अनेक श्रीमंतापासून ते गरीबापर्यंत होतोय. जोपर्यंत या विषाणूचे स्वरूप, त्याचा प्रसार आणि व्याप्ती याचा ताळेबंद घालायच्या आताच या विषाणूने व्यस्त प्रमाणात पसरायला सुरुवात केलेली आहे. अजूनतरी या आजारावर लस बनवण्यात विषाणू शास्त्रज्ञांना यश आलेले नाही. भारतात देखील कोरोनाची साथ पसरत आहे. भारतात आजच्या घडीला ८७३ केसेस (सरकारी आकड्यानुसार) निदर्शनास आल्या आहेत. मृत्यू १७ झाले आहेत. यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत.गेल्या २४ मार्चला रात्री ८च्या सुमारास देशाला संबोधित करताना २१ दिवसांच्या (१४ एप्रिल पर्यंतची) संचारबंदीची घोषणा पंतप्रधानांनी केली. त्या आधी त्यांनी २२ मार्च रोजी एक दिवसाचा ‘जनता कर्फ्यु’ पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बरेच कर्तव्यदक्ष लोक अहोरात्र आपल्या जीवाची परवा न करता सेवा देत आहेत. या लोकांप्रती सामजिक कृतज्ञता म्हणून टाळ्या/थाळ्या/शंख इत्यादी आपल्या गॅलरीमधून किंवा घरातून वाजवून या सर्व लोकांचे आभार पंतप्रधानांनी प्रदर्शित करायला सांगितले होते. देशातील काही भागातील लोकांनी कर्फ्यूचे गांभीर्याने पालन केले नाही. उलट कर्फ्यूला थोडं कंटाळतच पाच वाजवले आणि आपली सामाजिक कृतज्ञता व्यक्त करायला सुरवात केली. यामध्ये काही जण ढोल-ताशा, फटाके घेऊन रस्त्यावर/चौकात पोहोचले. या सर्व गोष्टींचा अनुक्रम आपल्या सर्वांना माहीत आहे. अशा अवघड परिस्थितीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाच्या विरुद्ध लढायला पाहिजे. ही वेळ लिखाणातून चुका दाखवण्याची नाही. या लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाने घरी बसून आपले सहकार्य शासकीय यंत्रणांना दिले पाहिजे. तरीदेखील पंतप्रधानांच्या भाषणांनंतर काही प्रश्न सतत मनात घोळत राहतायत त्या संदर्भाने मी इथे उहापोह करणार आहे.तर भाषणात २१ दिवसांची बंदी झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी किराणामाल/ दैनंदिन गोष्टीसाठी गर्दी झाल्याची पाहायला मिळाली. पुढचे किमान २१ दिवस घरातून बाहेर जाता येणार नसल्यामुळे बऱ्याच लोकांनी सामाजिक अंतराचे भान न ठेवता कोरोना संसर्गाचा धोका पत्करून खरेदीला बाहेर पडण्याचे ठरवले. जवळच्या किराणा दुकान आणि मॉलमध्ये गर्दी केली. दुसरीकडे सामाजिक माध्यमांवर कर्फ्युचे उल्लंघन केल्यानंतर पोलिसांची लाठी खाल्लेल्या लोकांचे व्हिडीओ देशभरातून फिरत आहेत. आता मुद्दा खरतर इथून सुरू होतो की, इतक्या भयंकर संसर्गजन्य आजाराची स्थिती गंभीर होण्याची चिन्हे असताना पंतप्रधान बरोबर रात्री आठ वाजताच देशातील नागरिकांशी संवाद का साधतात? त्या रात्री ८च्या भाषणात ते सांगतात की, त्याच दिवशीच्या रात्रीच्या १२ वाजतापासून २१ दिवसांचा लॉकडाऊन पूर्ण देशात लागू करण्यात येत आहे. याचा अर्थ संपूर्ण देश बंद. कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाऊन हा चांगला निर्णय आहे. या लॉकडाऊनमुळे विशिष्ट सामाजिक अंतर राखलं जाईल आणि या आजाराचा जास्त प्रसार होणार नाही. त्याला या मार्गाने लवकर थांबता येईल.

Explanation:

HOPE IT'S HELPFUL FOR YOU PLEASE MARK ME AS BRAINLIST PLEASE PLEASE..........

Similar questions