Social Sciences, asked by prernavlko1028, 6 months ago

creative writing on market place

Answers

Answered by mayurmarathe604
0

Answer:

योजनाबद्ध रीतीने शोधायचे ठरवले तर आपल्याभोवती प्रगतीच्या अनेक कल्पक पर्यायांचा खजिना आहे, त्यातून आपल्याला आनंद आणि समाधान देणाऱ्या गोष्टींचा आपल्याला पाठपुरावा करता  येतो. सर्जनशील लिखाणातील संधींचा आढावा घेणारा लेख

जर तुम्हाला अभिनव, कल्पक लेखनाची आवड असेल, तर हा छंद जोपासून त्यात करिअर करण्यासारखा दुसरा आनंद नाही. खरे सांगायचे तर, कलेच्या प्रांतात प्रगती साधणे, हे काही तितकेसे सोपे काम नाही, कारण शेवटी निर्मितीक्षम लेखन म्हणजे एका परीने कलेची आवड आहे. ती पूर्ण करण्यासाठी बौद्धिक मेहनत, आंतरिक ऊर्मी, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती यांची गरज असतेच, शिवाय स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मिळालेल्या संधींतून बऱ्याचदा आíथक लाभ फारसा होत नाही, ते वेगळे.

लेखन हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या व्यक्ती म्हटल्या की, आपल्या डोळ्यासमोर लगेच कादंबरीकार, पत्रकार अशा व्यक्ती उभ्या राहतात, पण या व्यतिरिक्त इतरही काही लेखन प्रकारांचा यात अंतर्भाव होतो. कलात्मक लेखनाचे आणखीही काही प्रकार खाली नमूद केले आहेत. यांतील कोणता प्रकार कधी फलदायी ठरेल कोणालाच सांगता येत नाही, पण आपल्याला भावणारा प्रकार निवडायला काय हरकत आहे?

* शुभेच्छा पत्रांवरील मजकूर लिहिणे

* विनोदी पुस्तक लेखक

* कादंबरी लेखक

* निर्मितीक्षम लेखनाचे प्रशिक्षक

* जाहिरातीसाठी लेखन करणाऱ्या व्यक्ती

* छोटय़ा- मोठय़ा पडद्यासाठी लेखन करणाऱ्या व्यक्ती

* गीतकार

* लघुकथालेखक किंवा कादंबरीकार

* क्रियाशील लेखनाच्या कार्यशाळेतील प्रशिक्षक

* स्वत:चे नाव उद्धृत न करता दुसऱ्या कोणासाठी तरी लेखन करणारे लेखक

* पर्यटन किंवा प्रवासवर्णनपर लेखन.

* विशिष्ट विषयांवर लेख लिहिणाऱ्या व्यक्ती

* स्तंभलेखक

* व्हिडीओ किंवा संगणकावर खेळल्या जाणाऱ्या गोष्टीरूप खेळासाठी कथा, संवाद लिहिणे.

* वेगवेगळ्या सण-समारंभातून म्हणण्यासाठी गाणी किंवा कविता रचणाऱ्या व्यक्ती.

* नाटय़लेखक

* ब्लॉग लेखक

* लेखनाच्या नित्यनवीन कल्पना सुचविणारे सल्लागार.

विविध संधी

अलीकडच्या काळात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्यापुढे नोकऱ्यांसाठी अनेक क्षेत्रातील पर्याय तयार असतात. त्यातून क्रियाशील बुद्धिमत्तेचे उमेदवार चाकोरीबाहेरील एखादे क्षेत्र निवडून त्यात सहज स्वत:ला गुंतवून ठेवू शकतात. आजच्या काळात यशस्वी होण्यासाठी करिअरच्या मळलेल्या वाटा सोडून काहीतरी वेगळा विचार करणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे लाभदायक ठरू शकते. उत्कट आवड असणाऱ्या एखाद्या कार्यक्षेत्रात प्रावीण्य मिळवणे, आपल्या व्यावसायिक उपयोगितेत भर घालते, याचा लाभ म्हणजे आपण केलेल्या उल्लेखनीय कामांमुळे, आपल्या पडत्या काळातही आपण लोकांच्या लक्षात राहतो.

मोठी व्याप्ती असलेल्या कलात्मक आस्थापनात सर्वच आकृतिबंध ठरलेला असतो. कामांची वाटणी साचेबंद असते. अशा ठिकाणी बऱ्याचदा एका ठरावीक कामातच अडकून राहिल्यासारखे होते. यामुळे सभोवती चालणाऱ्या अन्य कामांचे स्वरूप किवा त्याबद्दलचे शिक्षणही मिळू शकत नाही. या उलट तुलनेने लहान आकाराच्या संस्थेत, प्रत्येक लहान-मोठय़ा कामाची माहिती होते. कामाच्या अनेक अंगांची ओळख होते. हे सर्व जरी खरे असले तरी, परिचय पत्रात जर कोणत्याच मोठय़ा आस्थापनेतील कामाच्या अनुभवाची नोंद नसेल तर नावाजलेल्या किंवा इतर मोठय़ा संस्थेत नोकरीची संधी मिळणे कठीण होऊ शकते. थोडक्यात समृद्ध भविष्यकाळासाठी लवकरात लवकर मोठय़ा, प्रस्थापित संस्थेत कामाची संधी मिळवणे केव्हाही श्रेयस्कर.

आवश्यक कौशल्ये

बहुतेक वेळा अनेक शंकांचे समाधान समर्पक उत्तरांद्वारे करता येते. उदा. न्यूनत्व वाटणाऱ्या आपल्या परिचयपत्रातील काही जागा, शोधप्रबंधाचे किंवा पदवी शिक्षणातील काही वैविध्यपूर्ण विषय, आगामी काळातील कार्यानुभव अशा गोष्टींवर  प्रभुत्व असेल तर समोरच्या व्यक्तीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देता येतात.

लोकसंग्राहक वृत्ती : बहुतेकदा कल्पक योजना राबविण्यासाठी, कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुरेशा आíथक पाठबळाची, अर्थात भरपूर लोकांच्या सहभागाची गरज असते. असा आवश्यक प्रेक्षकवर्ग हेरण्याची, योग्य संवादातून त्यांना अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची, आíथक पाठिंबा देण्यासाठी गळ घालण्याची कला जर एखाद्या व्यक्तीत असेल तर अशी व्यक्ती संस्थेसाठी फार महत्त्वाची ठरते.

असे गुण अंगी बाणवायचे असेल तर अशा प्रकारच्या इतर मोठय़ा कार्यक्रमांना उपस्थित राहणे गरजेचे ठरते. तेथे येणाऱ्या प्रेक्षकवर्गाचा अभ्यास करणे, त्यांच्या उपस्थितीमागील प्रयोजन अभ्यासणे, त्यांच्याशी संवाद साधणे महत्त्वाचे ठरते. लोकांची कलात्मक अभिरुची कोणत्या विषयात आहे याचाही अंदाज घेणे आवश्यक ठरते. एखाद्या ग्राहकाच्या नजरेतून विचार केला की असे ज्ञान मिळवणे सोपे होते. कामानिमित्त भेटणाऱ्या लहान-मोठय़ा व्यक्तींच्या संपर्कात राहून त्यांच्या कामाची माहिती घेणे उपयोगाचे ठरते. या अशा भेटी आपल्या जाता-येता प्रवासातही घडू शकतात. आपल्या नेहमीच्या कामाहून एखादे वेगळे काम आपल्याला खूप काही शिकवून जाते. फक्त हे सर्व स्वेच्छेने व उत्सुकतेने घडायला हवे.

Similar questions