Business Studies, asked by sanniaarora398, 1 year ago

CRPF INFORMATION in marathi

Answers

Answered by vaishuborawake2004
5

केंद्रीय रिजर्व पोलीस दल (CRPF)

केंद्रीय रिजर्व पोलीस दलाचे पूर्ण नाव Crowns Representative Police होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे नाव बदलून केंद्रीय रिजर्व पोलीस दल ठेवण्यात आले. १९६५ पर्यंत भारत – पाकिस्तान सीमेच्या सुरक्षेचे दायित्व CRPF च्या हातात होते. जे BSF तयार केल्यानंतर हस्तांतरित करण्यात आले.

CRPF चे मुख्य दायित्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांची मदत करणे हे आहे. याव्यतिरिक्त नैसर्गिक आपत्ती किंवा दंगलीं नियंत्रित करणे तसेच विशेष परिस्थिती मध्ये सैन्याद्वारे केल्या जाणाऱ्या ऑपरेशन मध्ये सहायक दलाच्या रुपात कार्य करणे हे आहे.

२००१ मध्ये संसदवर झालेल्या हल्ल्यामध्ये सुद्धा CRPF च्या सैनिकांनी पाच आतंकवाद्यांना कंठस्नान घातले होते.

Answered by bhaveshmunot16pdchtf
1

जेवढे महत्त्व भारतीय सैन्याचे आहे तेवढेच महत्त्व ह्या निमलष्करी दलांचे आहे!

भारतीय सशस्त्र दलांना मुख्यत: तीन भागांमध्ये विभागलेले आहे. भारतीय सेना, भारतीय नौसेना आणि भारतीय वायुसेना. भारताचे राष्ट्रपती भारतीय सशस्त्र दलांचे सुप्रीम कमांडर असतात.

१३ लाख सैनिकांसमवेत भारताकडे जगातील तिसरी सर्वात मोठी सेना आहे. या भारतीय सशस्त्र दलांना निमलष्करी दलांकडून मदत मिळते. भारतीय सशस्त्र दल मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते. भारतात पाच केंद्रीय सुरक्षा दल कार्यरत आहेत-

सीमा सुरक्षा दलाची स्थापना भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमांच्या स्थायी सुरक्षेसाठी केली गेली होती. या दलाची प्रमुख कर्तव्ये म्हणजे सीमेवर राहणाऱ्या लोकांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण करणे, सीमेवर होणारी तस्करी रोखणे तसेच सीमेवर होणारी घुसखोरी रोखणे ही आहेत.

युद्धाच्या काळामध्ये सीमा सुरक्षा दल भारतीय भूदलाचे प्रमुख सहायक दल म्हणून काम करते. सीमा सुरक्षा दल एक सशस्त्र सैन्य आहे. आपत्तीच्या काळात सीमा सुरक्षा दल देशाच्या अंतर्गत भागात शांती स्थापन करण्यासाठी मदत करते. सध्या सीमा सुरक्षा दल अतिशय शांतीपूर्वक भारताच्या ६४७६ किमी लांब असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमांवर पाळत ठेवते आहे.

केंद्रीय रिजर्व पोलीस दल (CRPF)

केंद्रीय रिजर्व पोलीस दलाचे पूर्ण नाव Crowns Representative Police होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे नाव बदलून केंद्रीय रिजर्व पोलीस दल ठेवण्यात आले. १९६५ पर्यंत भारत – पाकिस्तान सीमेच्या सुरक्षेचे दायित्व CRPF च्या हातात होते. जे BSF तयार केल्यानंतर हस्तांतरित करण्यात आले.

CRPF चे मुख्य दायित्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांची मदत करणे हे आहे. याव्यतिरिक्त नैसर्गिक आपत्ती किंवा दंगलीं नियंत्रित करणे तसेच विशेष परिस्थिती मध्ये सैन्याद्वारे केल्या जाणाऱ्या ऑपरेशन मध्ये सहायक दलाच्या रुपात कार्य करणे हे आहे.

Similar questions