India Languages, asked by TransitionState, 1 year ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन 2019...

Answers

Answered by fistshelter
3

Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक भारतीय वकील, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते.

त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्यांसाठी (दलितांप्रती) सामाजिक भेदभावाविरूद्ध मोहीम राबविली, तसेच महिला आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन केले. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदे व न्याय मंत्री, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतीय प्रजासत्ताकाचे संस्थापक होते.

१९४८ पासून आंबेडकर मधुमेह ग्रस्त होते. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथील निवासस्थानी आंबेडकरांचे झोपेत निधन झाले.

Explanation:

Answered by tanuja200746
3

Answer:

महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो.आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्व' मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे २५ लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात, व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात. राजकीय नेते व इतर मंडळी बाबासाहेबांच्या सार्वजनिक ठिकाणच्या आंबेडकर स्मृतीस्थळांना वंदन करतात

Explanation:

Hi please Brainliest mark kar

Similar questions