History, asked by mtbstablet, 3 months ago

२. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना 'भारतीय घटनेचे शिल्पकार' का म्हणतात?​

Answers

Answered by sus17
3

सुरुवातीच्या पहिल्या लेखात आपण स्वतंत्र भारताची नवी दिशा ठरवणऱ्या घटनानिमिर्तीची थोडक्यात माहिती जाणून घेतील. त्या अंतर्गत येणाऱ्या घटना समिती आणि मसुदा समितीबाबत देखील माहिती आपण जाणून घेतली. तर मसुदा समितीच्या उर्वरित माहितीवर आपण आज प्रकाश टाकणार आहोत. तसं संविधान हा विषय निघाला कि निश्चितच त्याच्या निर्मितीसाठी हातभार लावणाऱ्या दिग्गजांची नावं समोर येतात. ती येणं भागच आहे त्यात कोणताही दुजाभाव नाही. मात्र घटनेचा शिल्पकार म्हटलं कि निर्विवादपणे बाबासाहेबांचं नाव येतं. त्याच कारणंही तसंच आहे. २९ ऑगस्ट १९४७ रोजी घटना परिषदेमार्फत मसुदा समितीची निवड झाली. या समितीचं अध्यक्षपद बाबासाहेबांकडे होतं. परंतु बाबासाहेबांकडे मसुदा समितीचं अध्यक्षपद इतक्या सहजासहजी आलेलं नव्हतं. अर्थात यासाठी देखील त्यांना अनेक अग्निपरीक्षा द्यावा लागल्या होत्या. पण ते म्हणत ना स्वतः ला सिद्ध करण्यसाठी प्रत्येकालाच एक संधीची गरज आहे. आणि हीच संधी बाबासाहेबांना १७ डिसेंबर १९४६ ला मिळाली. बाबासाहेबांना संविधान सभेसमोर संविधानाच्या प्रारूपावर मत मांडण्यासाठी अचानक आमंत्रित करण्यात आलं.(अचानक यासाठी कि इतर सदस्य आपलं मत मांडण्यासाठी बाकी असताना आपला नंबर आज लागेल याची त्यांना कल्पना नव्हती) बाबासाहेबांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच याचा उल्लेख केला. यावेळी बाबासाहेबांनी घटनेचे प्रारूप कसे असावे यावर आपले मत मांडले. आपल्या बुद्धीचातुर्यानुसार त्यांनी एकही मुद्दा मागे न सोडता देशहितासाठीची घटना सदस्यांसमोर उभी केली. बाबाहेबांच्या भाषणातील प्रत्येक शब्द हा देशाचं भविष्यचं जणू वर्तवत होता. त्यावेळी सभागृहातील प्रत्येक सदस्य बाबासाहेबांचं भाषण शांततापूर्वक ऐकत होते. ‘संधीचं सोनं करणं’ म्हणतात ते हेच. बाबासाहेबांनी आपल्याला संधीचं सोनं करत सभागृहातील त्या प्रत्येक सभासदाच्या मनावर स्वतःची एक वेगळीच छाप सोडली. खरंतर तेव्हाच बाबासाहेब घटनेचे शिल्पकार बनले होते.

Answered by buddheshvaghchaure
0

Explanation:

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना 'भारतीय घटनेचे शिल्पकार' का म्हणतात?

Similar questions