डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांवर निबंध लिहा
Answers
मंचावर उपस्थित मान्यवरांना मी वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरवात करते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर एक अष्टपैलू व्यक्तीमत्व आहेत. यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर, यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला. त्यांच्या वडीलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते. लहानपणापासून त्यांना वाचनाची आवड होती. सामाजिक, आर्थीक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, कायदेविषयक, पत्रकारिता इ. विविध विषयांचे त्यांना सखोल ज्ञान होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीनदलितांच्या, शोषितांच्या जीवनाला अंधारातून प्रकाशात आणले. त्यांना ज्ञानाचा संदेश दिला. ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.’ असे ते सांगत असे. 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली व असंख्य बौद्ध धर्मातील भिक्खुंना उपाधी प्रदान केली. अशा या महान नायकाचे निधन 6 डिसेबंर 1956 रोजी झाले. इ.स.1990 साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय राज्यघटनेची निर्मिती करणारे आगळेवेगळे व्यक्तीमत्व म्हणजे बाबासाहेब. जय हिंद! जय भारत!