डा. बाबासाहेबांंच्या आजोबांचे नाव काय होते
Answers
Answer:
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (सकपाळ) कुटुंब हे मूळचे कोकणातील "आंबडवे" गावचे रहिवासी होते. मालोजी सकपाळ हे भारतीय ब्रिटिश सैन्यात सैनिक म्हणून कार्यरत होते. त्यांचा मुलगा रामजी हे सुद्धा भारतीय ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत होते. रामजी व त्यांच्या पत्नी भीमाबाई यांचा सर्वात लहान पुत्र भीमराव (बाबासाहेब आंबेडकर) होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रांतातील (सध्या मध्य प्रदेश) महू (आता डॉ. आंबेडकर नगर) नावाच्या ब्रिटिश छावणीत झाला, कारण त्यावेळी डॉ. आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे महू मध्ये कार्यरत होते. रामजींच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचे कुटुंब परत महाराष्ट्रामध्ये आले.[१]
Answer:
बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारांत शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते.[३]