डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या संरक्षण विषयाच्या कार्याची माहिती लिहा
Answers
अणुऊर्जेच्या शांततामय उपयोगाचे पुरस्कर्ते. भारतातील अणुसंशोधन व अवकाश – संशोधन कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पकार.
भाभा यांचा जन्म मुंबई येथे सधन पारशी कुंटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेजात व इन्स्टिटयूट ऑफ सायन्समध्ये झाले. १९२७ मध्ये त्यांनी केब्रिंज येथील गॉनव्हिले अँड कायस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९३० मध्ये ते मेकॅनिकल सायन्सेस ट्रायपॉस ही परीक्षा उत्तीर्ण झाले. १९३२-३४ या काळात त्यांना गणिताची राऊस बॉल प्रवासी शिध्यवृत्ती मिळाली होती. १९३४ मध्ये त्यांना केंब्रिज विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी मिळाली.
भाभा यांना सैद्धांतिक विज्ञानाची, विशेषतः गणिताची, फार आवड होती. पी. ए. एम्. डिरॅक या सुप्रसिध्द गणितीय भौतिकीविज्ञांकडे त्यांनी गणिताचे अध्ययन केले. १९३० साली ते कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत सैद्धांतिक भौतिकीचे अध्ययन करीत असताना त्यावेळेस जे. डी. कॉक्रॉफ्ट, ई. टी. एस्. वॉल्टन, पी. एम्. एस्. ब्लॅकेट व जेम्स चॅडविक हे भौतिकीविज्ञ अणुकेंद्राच्या संरचनेवर महत्त्वाचे संशोधन करीत होते. भाभा यांनी झुरिक येथील डब्ल्यु. पाउली, उत्रेक्त (नेदर्लंड्स) येथील एच्. ए. क्रॅमर्स आणि रोम येथील एन्रीको फेर्मी यांच्या संशोधनकेंद्रांना भेटी दिल्या होत्या. कोपनहेगन येथील नील्स बोर यांच्या संशोधनकेंद्रातसुद्धा त्यांनी संशोधन केले. अशा प्रकारे भाभा यांचा अनेक प्रसिद्ध भौतिकविज्ञांबरोबर प्रत्यक्ष संबंध आलेला होता.
भाभा यांचे पहिले संशोधन इलेक्ट्रॉन व पॉझिट्रॉन (इलेक्ट्रॉनइतकेच द्रव्यमान असलेला पण धन विद्युत् भारयुक्त कण) यांच्या परस्पर प्रकीर्णनाच्या काटच्छेदाच्या (या कणांचे एकमेकांवर आघात होऊन ते विखुरले जाण्याच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या लक्षणीय क्षेत्रफळाच्या) गणनेसंबंधी असून हे प्रकीर्णन त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. डब्ल्यू हायलाइटर यांच्या बरोबर भाभा यांनी संशोधन करून ⇨विश्वकिरणांमध्ये (अवकाशातून सर्व दिशांनी पृथ्वीवर येणाऱ्या भेदक किरणांमध्ये) जे द्वितीयक इलेक्ट्रॉन वर्षाव (प्राथमिक विश्वकिरणांतील कणांचे वातावरणातील रेणूंवर आघात होऊन निर्माण होणारे इलेक्ट्रॉन वर्षाव) मिळतात त्यांचे ‘प्रपात प्रक्रिया’ या नावाने ओळखण्यात येणारे स्पष्टीकरण दिले. या मीमांसेप्रमाणे विश्वकिरणांतील उच्च ऊर्जायुक्त प्राथमिक कण (प्रोटॉन) पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा त्याची वातावरणातील अणूंबरोबर विक्रिया होऊन शेवटी गॅमा किरण मिळतात. गॅमा किरणांचे योग्य परिसरात इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन युग्मात परत रूपांतर होते. गॅमा किरणनिर्मिती व इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन युग्मनिर्मिती या घटना पुनःपुन्हा एकामागून एक होत गेल्यामुळे इलेक्ट्रॉनांच्या संख्येत झपाटयाने वाढ होऊन (पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळच्या भागात) त्याचे वर्षावात रूपांतर होते. हा सिद्घांत ‘भाभा-हाइलाइटर सिद्धांत’ या नावाने प्रसिद्ध आहे. भाभा यांनी ’मेसॉन’ या मूलकणाचे असित्त्व ओळखण्याच्या दृष्टीने विशेष कार्य केले आहे. भाभा यांनी केलेल्या कार्याला सर्वत्र मान्यता मिळाली आणि १९४१ साली त्यांची लंडनच्या रॉयल सोसायटीचे सभासद म्हणून निवड झाली.
Answer:
अवुल पकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम (अंग्रेज़ी: A P J Abdul Kalam), जो मिसाइल मैन और जनता के राष्ट्रपति नाम से भी जाने जाते हैं, भारतीय गणतंत्र के ग्यारहवें निर्वाचित राष्ट्रपति थे।[2] वे भारत के पूर्व राष्ट्रपति, जानेमाने वैज्ञानिक और अभियंता (इंजीनियर) के रूप में विख्यात थे। उन्होंने सिखाया जीवन में चाहें जैसे भी परिस्थिति क्यों न हो पर जब आप अपने सपने को पूरा करने की ठान लेते हैं तो उन्हें पूरा करके ही रहते हैं। अब्दुल कलाम मसऊदी के विचार आज भी युवा पीढ़ी को आगे बढ़ने के लिए प्रेरित करते हैं।