History, asked by kalerajkumar77, 7 months ago

डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा.​

Answers

Answered by syedtahir20
0

आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी

गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या

भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतातसमाजजीवनसुद्धा त्यांवर अवलंबून असते.

उदाहरणार्थ, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे

जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक

कष्टाचे असते. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची

उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रदेशात सुपीक

शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यामुळे

डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्ये आणि भाज्या

कमी प्रमाणात उपलब्ध असतात, तर तुलनेने मैदानी

प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात. त्याचा

परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो. डोंगराळ

प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर

आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक

अवलंबून रहावे लागते. अशाच पद्धतीने डोंगराळ

प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या

लोकांच्या जीवनपद्धतीतील इतर गोष्टींमध्येही फरक

आढळतो.

Similar questions