डिजीटल शिक्षण मराठी निबंध
Answers
Explanation:
मार्च-२०१७ च्या पहिल्या आठवडय़ात ठाणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यतील सर्व शाळा डिजिटल (संगणकीकृत) शाळा झाल्याचे जाहीर केले. संदीप गुंड नावाच्या एका हरहुन्नरी शिक्षकाने पाच वर्षांपूर्वी स्वत:च्या पैशाने नि तंत्रज्ञानाच्या कौशल्याने पष्टेपाडा, ता. शहापूर, जि. ठाणे येथे डिजिटल शाळेची मुहूर्तमेढ रोवली. ‘डिजिटल शाळा’ या संकल्पनेचा वटवृक्ष आज राज्याबाहेर फोफावत आहे. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमध्ये त्याचे अनुकरण चालू आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाने प्रगत शाळा, शाळासिद्धी या नव्या उपक्रमांतर्गत तंत्रस्नेही, ई-लर्निग, ई-क्लास या संकल्पनेवर भर दिला आहे. याच दरम्यान एक-एक जिल्हा परिषद संपूर्ण डिजिटल शाळा करण्याचा इष्टांक ठरवून कामाला लागली. ठाणे जिल्हा परिषदेने हा मान मिळवला, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. जिल्ह्यतील १,३६३ शाळा डिजिटल झाल्या असे जिल्हा प्रशासन सांगत आहे.
नेमकी परिस्थिती काय?
जिल्हा प्रशासनाच्या दाव्याप्रमाणे कागदोपत्री सुमारे ९० टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. वरिष्ठांचा फतवाच आल्यामुळे मुख्याध्यापकांना शाळा डिजिटल झाली असे कागदोपत्री लिहून द्यावे लागले आहे. पेसाअंतर्गत मंजूर अनुदान अजूनही काही ग्रामपंचायतीकडून शाळा विनियोगासाठी देण्यात आलेला नाही. ग्रामसेवकांनी ठराव मंजूर करून अनुदान वर्गही केले व रक्कम स्वत:च काढून सामूहिकरीत्या प्रोजेक्टर, लॅपटॉप आणून देण्याचे कंत्राट स्थापले आहे. काही शाळांमध्ये सामान येऊन पडले आहे, तर काही ठिकाणी फिटर नसल्यामुळे काम अडले आहे. काही शाळांनी १५ ऑगस्ट २०१६ च्या ग्रामसभेत ठराव मंजूर करून घेऊनही मार्च २०१७ अखेर प्रोजेक्टरची जोडणी झालेली नाही. बऱ्याच शाळांना निष्कृष्ट दर्जाचे साहित्य ग्रामसेवकांनी पुरविले आहे. मुख्याध्यापकांना व व्यवस्थापन समितीला अनेक ठिकाणी अज्ञानात ठेवले गेल्याचे चित्र आहे. इथे मुद्दा साहित्य कोणी पुरवले हा नसून त्याचा दर्जा कसा आहे किंवा असावा याला काहीच धरबंद उरलेला नाही.
शालेय पातळीवरची अवस्था सुमारे २५ टक्के शाळाज्यांनी स्वयंस्फूर्त व लोकवर्गणीतून सुरुवातीच्या टप्प्यातच शाळा डिजिटल केल्या आहेत, त्यांचे चित्र वाखाणण्याजोगे आहे. डिजिटल खोली, रंगरंगोटी, विद्युतीकरण, वायुविजनाची सोय, फर्निचर आदींचे छान नियोजन दिसून येतेय. तेथील शिक्षकांची गुंतवणूक त्या प्रकल्पात नेमकेपणाने जाणवत राहते.