डंका वाजवणे वाक्प्रचाराचा अथ सांगून वाक्यात उपयोग करा.
Answers
Answer:
अंगाचा तिळपापड होणे
Explanation:
संताप होणे
Answer:
डंका वाजवणे = जाहीर करणे, सर्वांना कळविणे.
Explanation:
वाक्प्रचाराचा वाक्यांत उपयोग:
१. रविवारी होणाऱ्या कार्यक्रमाचा डंका वाजला आणि सर्वच जण तयारीला लागले.
२. बहुप्रतीक्षित परीक्षेच्या निकालाचा डंका वाजला आणि विद्यार्थांचा जीव भांड्यात पडला.
३. कठोर परिश्रम करून यशस्वी व्हावे आणि आपल्या यशाचा डंका सर्वत्र वाजवावा, हेच प्रत्येकाचे स्वप्न असते.
डंका वाजवणे हा वाक्प्रचार अनेकदा वापरला जातो.
"डंका" या शब्दाचा अर्थ "ढोल" किंवा तत्सम वाद्य असा होतो.
डंका किंवा ढोल वाजवणे म्हणजेच आवाज निर्माण करणे असा या वाक्प्रचाराचा शब्दशः अर्थ होतो.
एखादी गोष्ट जाहीर करणे, त्या विषयी सर्वांना सांगणे हा या वाक्प्रचाराचा मूळ अर्थ आहे.
पूर्वीच्या काळात राजे, महाराजे एखादा आदेश आपल्या राज्यांमधील प्रजेपर्यंत पोहचविण्यासाठी दवंडी पिटत असत.
एक माणूस ढोल वाजवत त्या आदेशाचे वाचन करतो व तो आदेश अथवा ती माहिती जाहीर करतो.
यावरूनच "डंका वाजवणे" हा वाक्प्रचार आला असावा.