डोळ्यात भरणे वाक्प्रचाराचा अर्थ
Answers
Answer:
शोभून दिसणे, नजरेत भरणे. ... गाई पाण्यावर येणे -
Answer:
डोळ्यांत भरणे = दृष्टिसुख मिळणे, दृष्टीला आनंदित करणे.
Explanation:
डोळ्यांत भरणे हा एक अवयवांवर आधारित वाक्प्रचार आहे.
याचा शब्दशः अर्थ हा 'डोळ्यांमध्ये काहीतरी भरणे, साठवणे' असा होतो.
मात्र, प्रत्यक्षात याचा अर्थ हा 'एखादे दृश्य पाहून आनंदी होणे' असा होतो.
जेव्हा आपण एखादे अविस्मरणीय दृश्य पाहतो, तेव्हा आपल्याला असे वाटते की, आपण हे कधीच विसरू नये.
असेच दृश्य आपण जणू काही आपल्या डोळ्यांत भरतो, साठवतो.
वाक्प्रचाराचा वाक्यांत उपयोग:
१. गुलाबाच्या फुलांचा गुच्छ मी माझ्या डोळ्यांत भरला.
२. पावसाळ्यातील इंद्रधनुष्याचे ते रूप अजूनही माझ्या डोळ्यांत भरलेलेच आहे.
काही अवयवांवर आधारित वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:
१. हात मिळवणे = साहाय्य करणे.
वाक्य: वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सर्व गावकऱ्यांनी हातात हात मिळवला.
२. कान फुंकणे = गार्हाणे करणे.
वाक्य: कोणाचेही कान फुंकले की, भांडणे निश्चित.
३. डोळे वटारणे = भीती घालणे.
वाक्य: आजोबांनी लहानशा रामूला डोळे वटारले.
४. डोळ्यांचे पारणे फिटणे = सर्व इच्छा पूर्ण होणे.
वाक्य: आपल्या मुलांना यशस्वी होताना पाहून पालकांच्या डोळांयाचे पारणे फिटतात.