Dahavicha pariksha shalet pratham kramank alyia badahal mitrala patra ne kalava marathi patra
Answers
Answered by
8
दिनेश मोरे,
सरस्वती, ४०४,
बोरिवली (प)
प्रिय मित्रा,
हाय! कसा आहेस राजेश ? बऱ्याच दिवसांनंतर पत्र लिहायला वेळ मिळत आहे. आपण एक मेकांशी सुद्धा खूप दिवस बोललो नाहीत ह्याचे मला फार वाईट वाटले.
पत्र लिहायचे कारण म्हणजे तुला सांगायचे होते की, दहावीचा निकाल लागला हे तुला समजले असेलच आणि गोड बातमी अशी आहे की माझ्या शाळेत माझा पहिला क्रमांक आला आहे. मला ह्या बातमीवर विश्वास बसेना पण नंतर ही गोष्ट शंबर टक्के खरी आहे असे समजले.
सर्वात आधी मला तुला धन्यवाद द्यायचे आहेत कारण तू सांगितलेल्या पद्धतीने मी अभ्यास केला, नीट प्रश्न कसे सोडवायचे हे देखील तू मला सांगितले ह्या सगळ्या गोष्टींचा निश्चितच मला खूप फायदा झाला.
काका काकिंना विचारले म्हणून सांग.
तुझा मित्र,
दिनेश.
Similar questions