daptarachi atmakatha marathi essay
Answers
Answer:
Sorry I don't know Marathi
■■ दप्तराची आत्मकथा■■
नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र 'दप्तर' बोलत आहे.आता माझी पस्थितीती फार वाईट झाली आहे.पहिल्यांसारखा मी नीटनेटका नाही राहिलो.
आधी मी भड़क लाल रंगाचा होतो व माझ्यावर छान कार्टूनचे चित्र होते. माझा जन्म एका कारखान्यात झाला होता.तिथे माझ्याबरोबर माझ्यासारखेच बरेच मित्र होते.नंतर मला एका बुक डेपो मध्ये आणले गेले.
एके दिवशी माझ्या रंग आणि माझ्यावरच्या चित्रामुळे एका मुलाला मी आवडलो.त्याच्या आईने माझ्यातले कप्पे आणि चैन नीट तापसले व मला विकत घेतले.मी त्यादिवशी खूप खुश होतो.
त्याने मला शाळेत न्यायला सुरुवात केली.मी त्याचे पुस्तक,डब्बा,बॉटल यांचा भार उचलायचो.पहिले काही महीने त्याने मला नीट वापरले.मला तो नियमितपणे साफ करत असे,मला नीट ड्रावरमध्ये ठेवत असे.मी तेव्हा खूप आनंदी होतो.
पण थोड्या महीन्यातच तो माझ्याशी फार वाईट वागू लागला.मला कसाही फेकायचा, धुवत नसायचा, साफ नाही करायचा व पुस्तके कसेही कोंबायचा.मला या गोष्टीचे फार वाईट वाटले.
मी त्याची इतकी मदत केली आणि तो माझ्याशी वाईट वागला.पण मी त्याच्या उपयोगी पडलो ह्यातच मी समाधान मानतो.