Date:
महात्मा गांधीनी चंपाश्चासत्यागृह केला
Answers
Answer:
मित्रांनो, १९१७ मध्ये गांधीजी जेव्हा चंपारण्य येथे गेले तेव्हा त्यांचा तिथे दीर्घकाळ थांबण्याचा कोणताही उद्देश नव्हता. त्यांना चंपारण्यातील स्थितीची जास्त माहिती देखील नव्हती. परंतु गांधीजी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा ते तिथे काही आठवडे नाही तर कित्येक महिने राहिले. चंपारण्यानेच त्यांना मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधी बनविले. चंपारण्य येथे पोहोचण्यापूर्वी त्यांना सत्याग्रहाच्या ताकतीची माहिती होती. परंतु त्यांना माहित होते की, फक्त ते सत्याग्रही बनून त्यांना इच्छित परिणाम प्राप्त होणार नाही. त्यांना देशातील जनसमुदायाला सत्याग्रहाच्या ताकत लक्षात आणून द्यायची होती.
जेव्हा मॅजिस्ट्रेटने त्यांना चम्पारण्यातून निघून जायचे आदेश दिले तेव्हा ते म्हणाले की, न्यायालयाचा अवमान करण्यासाठी ते हा आदेश धुडकावून लावत नाहीत तर ते असं आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून आणि आपल्या अस्तित्वाचा सम्मान करण्यासाठी करत आहेत. संपूर्ण ब्रिटीश प्रशासन त्यांच्या या निर्णयामुळे मागे फिरले जेव्हा गांधीजी म्हणाले की मी या कारागृहात जाण्यासाठी तयार आहे, इंग्रजांनी या गोष्टीचा विचार देखील केला नव्हता. लोकं बघत होती की, दक्षिण आफ्रिकेवरून आलेला एक वकील येथे चम्पारण्यात येवून कशाप्रकारे तुरुंगात जायला तयार झाला. एवढ्या ऊनात संपूर्ण परिसरात धुळीमध्ये फिरत आहे. ऊन्हामध्ये कधी बैलगाडीतून, कधी पायी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गांधी जात होते.
तुम्ही हे लक्षात घ्या की, गांधीजी यावेळी लोकांच्या विचार प्रक्रियेला चालना देत होते. नीळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे जबाब नोंदवले जात होते, तपास करत होते. परंतु या प्रक्रियेमध्ये गांधीजी स्वतःला लोकांशी जोडून ठेवत होते, स्वःताला लोकांसाठी खर्ची करत होते, स्वःताचे उदाहरण देवून लोकांची शक्ती एकमेकांशी जोडत होते.
गांधीजी सांगायचे,”माझे जीवनच माझे दर्शन आहे.” आणि हेच आपण चम्पारण्यात पाहिले. गांधीजींनी आपल्या आत्मकथेत लिहिले आहे की, कशाप्रकारे लोकांना आपली शक्ती समजली आणि हे देखील समजले की परिवर्तन होऊ शकते, बदल घडू शकतात. त्यांनी लिहिले आहे की, १०० वर्षांपासून सुरु तीन काठिया कायदा रद्द होताच नील शेती करायला भाग पाडणाऱ्या इंग्रजांच्या सत्तेचा अस्त झाला. जनतेमधील जो समुदाय नेहमी दबावाखालीच राहायचा त्याला आपल्या शक्तीची थोडीफार जाणीव झाली आणि लोकांना असे वाटू लागले की, निळेचा डाग धुवू शकत नाही.
म्हणजेच, लोकांना जेव्हा वाटत होते काहीच होऊ शकत नाही, काही परिवर्तन घडू शकत नाही, या सगळ्याला गांधीजींनी लोकांचा भ्रम सांगितले आहे. हा भ्रम त्यांनी दूर केला आणि लोकांना त्यांच्या ताकतीची जाणीव करून दिली.
बंधू भगिनींनो, गांधीजी मूलतः स्वच्छाग्रही होते. ते सांगायचे- “ स्वच्छता स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्वपूर्ण आहे”. गावांमध्ये लोकं अज्ञान आणि निष्काळजीपणामुळे घाणीत आणि अस्वच्छ परिस्थितीमध्ये राहतात हे बघून गांधीजींना खूप त्रास व्हायचा. १९१७ मध्ये आदरणीय बापूंनी एका कार्यक्रमात सांगितले होते की, “ जो पर्यंत आपण आपल्या गावांमधील आणि शहरांमधील स्थिती बदलत नाही, स्वतःला वाईट सवयींपासून मुक्त नाही करत आणि चांगली शौचालये बांधत नाही तोपर्यंत आपल्यासाठी स्वराज्याचे काही महत्व नाही”.
एकप्रकारे पहिले तर देशामध्ये स्वच्छता आंदोलनाचे मूळ स्थान देखील चंपारण्याला मानू शकतो. त्यांनी स्वच्छतेला गांधीवादी जीवनशैलीचा एक अविभाज्य घटक बनविले. त्यांचे स्वप्न होते सर्वांसाठी संपूर्ण स्वच्छता.
मित्रांनो, चंपारण्यात जे मंथन झाले, जे प्रयत्न झाले, त्यातून आपल्याला पंचामृत मिळाले. जनसामान्यांना एकत्र आणून, मंथन करून, कार्य करून, संघर्ष करून या पंचामृतामुळे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला एक नवीन दिशा मिळाली.
जर आपण काळजीपूर्वक पाहिले तर लक्षात येईल की, चंपारण्यात गांधीजींनी जे काही केले, त्यामुळे ५ वेगवेगळे अमृत देशासमोर आले.हे पंचामृत आज देखील देशासाठी तितकेच महत्तवपूर्ण आहेत –
पहिले अमृत – लोकांना सत्याग्रहाची ताकत कळली,
दुसरे पंचामृत – लोकांना जनशक्तीची ताकत कळली,
तिसरे पंचामृत – स्वच्छता आणि शिक्षणाबद्दल भारतीय जनसामान्यांमध्ये नवीन जागृती निर्माण झाली,
चौथे अमृत – महिलांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न होऊ लागले,
आणि पाचवे अमृत – आपण स्वतःहून कातलेले वस्त्र घालण्याचे नवीन विचार निर्माण झाले. हे पंचामृत चंपारण्य आंदोलनाचे सार आहे.
मित्रांनो जेव्हा मी चंपारण्याविषयी बोलतो, तेव्हा मला बालमोहन म्हणजेच बाळ कृष्णाची आठवण येते. मोहन पासून मोहन पर्यंत कशी यात्रा सुरु आहे; एक सुदर्शन चक्रधारी मोहन तर दुसरा चरखाधारी मोहन. आपल्या सर्वांना माहित आहे जेव्हा बाळ कृष्णाने माती खाल्ली होती तेव्हा माता यशोदा खूप चिंतीत होती. याच चिंतेमध्ये जेहा यशोदा मातेने बाळकृष्णाला तोंड उघडायला सांगितले, तेव्हा त्यांनी मातेला संपूर्ण ब्रम्हांडाचे दर्शन घडविले. असे करून बाल मोहनने आपल्या मातेला चिंता मुक्त केले.
जेव्हा मी चंपारण्याविषयी बोलतो तेव्हा मला किशोर वयीन मोहन आठवतो. तो चक्रधारी मोहन जेव्हा किशोर वयीन होता, ज्याला आपण कृष्ण म्हणून ओळखतो, जो रासलीला करायचा, बासुरी वाजवायचा. मुसळधार पावसापासून गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी जेव्हा किशोर वयीन मोहनने गोवर्धन पर्वत उचलला, तेव्हा गावकऱ्यांना सांगितले की तुम्ही देखील काठी घेऊन उभे रहा तेव्हाच गोवर्धन पर्वत उचलला जाईल. जेव्हा गोवर्धन पर्वत उचलला तेव्हा प्रत्येकाला वाटत होते की, तो माझ्या ताकतीमुळे उचलला आहे, माझ्या काठीमुळे उचलला आहे. आणि अशाप्रकारे किशोर मोहनने लोकांना स्वतःच्या आणि सामुयिक ताकदीची ओळख करून दिली होती.