History, asked by navnathdudhate4707, 11 months ago

December 2018 madhe ksan dagdi kolsa khan durghatna kontya rajyat ghadli

Answers

Answered by fistshelter
1

Answer: १३ डिसेंबर,२०१८ रोजी मेघालयातील पूर्व जैंतिया पर्वतरांगांमध्ये एका बेकायदेशीर कोळसा खाणीत नदीचे पाणी शिरून तब्बल १५ कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी केवळ दोनच मृतदेह सापडले होते.

या दुर्घटनेनंतर राज्यातील बेकायदा खाणींचा प्रश्न समोर आला होता. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान मेघालय सरकारने राज्यात बेकायदा खाणी सुरू असल्याचे कबूल केले होते. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या समितीने दिलेल्या अहवालानुसार मेघालयामध्ये तब्बल २४ हजार खाणी असून, त्यापैकी बहुतांश खाणी बेकायदा व्यवसाय करत आहेत.

या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने मेघालय सरकारला १०० कोटी रुपयांचा दंड आकारला होता.

Explanation:

Similar questions