India Languages, asked by Abdida2316, 1 year ago

deshavishai prem aur abhiman essay in marathi

Answers

Answered by halamadrid
0

■■देशाविषयी प्रेम आणि अभिमान■■

माझ्या देशाचे नाव भारत आहे.मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे, त्याचबरोबर मी माझ्या देशावर खूप प्रेम करतो.

माझे देश आज जगात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. संपूर्ण जगात माझ्या देशाने मान मिळवले आहे आणि स्वतः ची ओळख निर्माण केली आहे.

मला प्रेम आहे माझ्या देशात असलेल्या विविधतेवर. इथे वेगवेगळ्या धर्माचे,जातीचे,वेगळ्या भाषा बोलणारे,सण साजरा करणारे लोक एकत्र राहतात. 'विविधतेत एकतेसाठी' माझे देश ओळखले जाते.

मला अभिमान आहे माझ्या देशाच्या सैनिकांवर जे माझ्या देशाची रक्षा दहशतवादी आणि दुश्मनांपासून करतात.मला माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्रयसैनिकांवर व माझ्या देशाला जगभर प्रसिद्धी देणाऱ्या लोकांवर अभिमान आहे.

मी माझ्या देशाच्या संस्कृति आणि परंपरेवर प्रेम करतो.माझ्या देशासारखा समृद्ध सांस्कृतिक वारसा दुसरीकडे पाहायला मिळणार नाही.

अशा प्रकारे, मला भारतीय असल्याचा खूप गर्व आहे.

Similar questions