detales about maratha samrajya ? who was the foundar of maratha samrajya? in marathi
Answers
Answer:
मराठा साम्राज्य इ.स. १६७४ ते इ.स. १८१८ दरम्यान भारतात अस्तित्त्वात असलेले हिंदू राज्य होते. याच्या परमोच्च बिणदूला या साम्राज्याने दक्षिण आशियाचा मोठा भूभाग व्यापला होता. हे साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६४५ मध्ये विजापूर राज्यातून पुण्याजवळील तोरणा किल्ला जिंकून स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालावधीत औरंगजेबाविरूद्ध गनिमी कावा वापरून केलेल्या लढायांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार प्रचंड वाढला. इ.स. १६८०मधील शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले आणि आपल्या ८ वर्षाच्या झंझावाती कारकिर्दीत स्वराज्याच्या सीमा वाढवल्या. १६८९ मध्ये फितुरीने औरंगजेबाने त्यांची हत्त्या केली. स्वराज्यात काही काळ अस्थैर्य माजले, सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजीराव जाधव सारख्या शूर सरदारांनी स्वराज्याचे अस्तित्व टिकवले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजींचे वंशज जरी राज्य करत असले तरी पंतप्रधान असलेल्या (प्रथम बाजीराव नंतर)पेशव्यांच्या हातात राज्यकारभाराची सूत्रे गेली . पेशवे हे प्रभावी राज्यकर्ते होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्य अधिक विस्तार पावले शेवटी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाण सैन्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. अखेरचा पेशवा दुसरा बाजीराव इंग्रजांबरोबर तिसऱ्या लढाईत पराभूत झाला व इंग्रजांच्या मदतीने पेशवा बनून बिठूर येथे स्थायिक झाला
गनिमी कावा, डोंगरांतून अभेद्य किल्ले बांधणे व त्यायोगे आसपासच्या क्षेत्रावर वचक ठेवणे हा मराठा साम्राज्याचा सुरुवातीला पाया होता. या साम्राज्याला मोठी किनारपट्टी होती व कान्होजी आंग्रे व इतर दर्यासारंगांच्या मदतीने ही सीमा प्रभावीपणे साम्भाळली. दक्षिण भारतातील इतर राज्ये व मराठा साम्राज्यातील हा एक मोठा फरक होता. मराठी आरमाराने पोर्तुगीज व ब्रिटिश आरमारांना शह दिल्यामुळे त्यांचा उपयोग करून या परकीय सत्तांना किनाऱ्यांकडून शिरकाव करता आला नाही. कान्होजी आंग्रे यांनी भारतातील पहिले मोठे आरमार उभे केले व त्यामुळे त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणले जाते
Explanation:
₱ⱡɇ₳₴ɇ ₥₳ɽ₭ ₳₴ ฿ɽ₳ł₦ⱡł₴₮
#∆₱ł₭₳₵ⱨʉʉʉ