Art, asked by aryan10838, 1 year ago

Dialogue between river and tree in Marathi in simple words

Answers

Answered by melitafern08
0

Answer:

काय रे झाड दादा. कसा आहेस तू? तब्येतपाणी ठीक ना?

झाड:

हो गं नदीताई. तुझ्या कृपेने सारं ठीक आहे. तुझ्या पाण्यात माझी मुळे टाकून मी लागेल

तेव्हा निवांत पाणी पीत बसतो. हिरवा हिरवागार राहतो मी, तो तुझ्या मुळेच!

नदी:

अरे! तू माझ्या काठी आहेस, म्हणून तुला पाणी मिळतंय बरं! पण दुष्काळी भागातील तुझ्या मित्रांना कुठे रे पाणी मिळेल!

झाड:

हो ना! नदीताई, तू जीवनवाहिनी आहेस आमची! तुझ्यामुळेच तर आपला परिसर असा समृद्ध आहे.

नदी:

अरे, त्यात माझं कसलं आलंय कौतुक! माझा स्वभाव आहे तो, सतत वाहण्याचा ! त्यामुळे मी झुळझुळ वाहत राहते. जिथे जाते, तिथे पाणी घेऊन जाते.

झाड:

तुझ्या असण्याने सर्वांना पाणी मिळतं बघ. तू बारा महिने वाहत असतेस. त्यामुळे लोक, प्राणी-पक्षी सगळे आनंदाने तुझ्याजवळ येतात. तुझे पाणी पिऊन तृप्त होतात. पाण्याचा वापर करतात.

नदी:

हं. तूही किती परोपकारी आहेस, झाडदादा. आपल्या प्रत्येक अवयवाचा वापर तू लोकांसाठी, पक्षी-प्राण्यांसाठी करतोस. कोणी तुझ्याशी वाईट वागो किंवा चांगले, तू सतत त्यांना मदतच करतोस.

झाड:

अगं ताई, तुझ्याकडूनच तर शिकलो सर्वांना मदत करण्याचा गुण! 'ताई' आहेस तू माझी. छोट्या भावाला चांगले संस्कार देणारी. (दोघेही हसतात.)

Similar questions