India Languages, asked by anjalishalgar30, 1 year ago

Dialogue between two unknown people in a bus in marathi

Answers

Answered by Akashofficial
2
● प्रवासी-1 (प्र-1)
● प्रवासी-2 (प्र-2)

प्र-1 : दादा जरा ती बॅग उचलाय मदत करता का ?

प्र-2 : हो नक्की, हे घ्या .

प्र-1 : धन्यवाद भाऊ, खूप मदत झाली बघा तुमची.

प्र-2: अहो मदत कसली, एक नागरिक होण्याची जबाबदारी पार पडली फक्त बाकी काय नाही.

प्र-1: होय होय, पण तुम्ही चाललंय कुठं ?

प्र-2 : आम्ही वाई ला चाललोय , तुम्ही कुठं?

प्र-1: आम्ही पाचवड ला बघा.

प्र-2: बर बर . पाचवड ला कोण असत तुमचं?

प्र-1: माझं गाव आहे ते, आई, वडील, मोठा भाऊ आहे तिथे.

प्र-2: हो का ... बर बर.

प्र-1 : तुमच्याबद्दल सांगा की, तुमचं कोण असतं ?

प्र-2 : वाई ला माझं घर आहे, सुट्टीला येतो , आता सुट्ट्या लागल्या मुलांना म्हणून आता गावी जायचं.

प्र-1 :अरे वाह! बर बर .

प्र-2: तुमचं सांगा, तुम्हाला मुलं-बाळ ?

प्र-1: हो आहे की, मोठी मुलगी दहावीत आणि छोटा मुलगा पाचवीत आहे.

प्र-2 : बर बर .

प्र-1: अरे ! बोलण्यात कळलंच नाही, पाचवड आलं की . चला भाऊ येतो , छान वाटलं बोलून तजमच्याशी .

प्र-2: हो मला पण.

प्र-1: चला येतो.
Similar questions