dialogue on save water in marathi between 5 friends
Answers
friends we have to understand that water is very precious people got for because of un clean water
■■ पाणी वाचवण्याबाबत पाच मित्रांमध्ये संवाद लेखन■■
●श्याम : अरे रवि, मी कालच टीवीवर बातमी ऐकली, की उद्यापासून दोन दिवसांसाठी आपल्याकडे पाणी येणार नाही.
●ऋतिक : हो मी सुद्धा ही बातमी पाहिली.
●राज : अरे, आमच्या विभागात तर कालपासूनच पाणी येत नाही.
●रवि : मला ही बातमी आईला सांगायला लागेल.
●साहिल : आरे मित्रांनो, अचानक आपल्याकडे पाण्याच्या समस्या कशा सुरु झाल्या?
●श्याम : हे तर होणारच होते, कारण आपण कोणी पाणी जपूण वापरत नाही.
●ऋतिक : हो, अगदी बरोबर बोलतोस श्याम. पाणी जपूण वापरले पाहिजे.
●राज : 'पाणी हेच जीवन', हे लोकांना कळायला हवे.
●साहिल : आपण पाणी वाचवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करायला हवी आणि त्यांना पाण्याचे महत्व पटवून दिले पाहिजे.
●रवि : हो, पाणी वाचवण्याची सुरुवात आपण प्रत्येकाने आपापल्या घरातून करायला हवी.
●श्याम : वाहते नळ बंद करणे तसेच जपूण पाणी वापरणे खूप गरजेचे आहे.
●ऋतिक : आपण पावसाचा पाणी साठवून ठेऊन त्याचा उपयोग घरगुती कामांसाठीसुद्धा करू शकतो.
●राज : अंघोळ करताना, ब्रश करताना आपण पाणी वाया नाही घालवले पाहिजे.
●साहिल : एखाद्या नळामध्ये लीकेज होत असल्यास, आपण ते नळ त्वरित दुरुस्त केले पाहिजे.
●रवि : खरंच, आपण सगळे एकत्र आलो, तर आपण पाणी वाचवू शकतो.
●ऋतिक : चला आजपासूनच पाणी वाचवायची सुरुवात करू.
● श्याम : हो,नक्कीच!चला मित्रांनो, आता घरी जायची वेळ झाली.उद्या भेटू!