Diwali celebration with family essay in Marathi
Answers
Explanation:
हा दीपोत्सवाचा उत्सव असून हिंदूंनी तो आनंदाने साजरा केला. या उत्सवात लोक दीयेस (बेकड चिकणमातीने बनविलेले लहान कप-आकाराचे तेलाचे दिवा) असलेली घरे आणि दुकाने पेटवून देतात. ते कल्याण आणि समृध्दीसाठी आणि श्रीमंती आणि बुद्धीसाठी लक्ष्मी देवीची पूजा करतात.
■■कुटुंबासोबत मी दिवाळी कशी साजरा करते■■
मी माझ्या कुटुंबीयांसोबत आनंदाने आणि उत्साहाने दिवाळी साजरा करते.मी आईला फराळ बनवण्यासाठी आणि इतर वेगवेगळे प्रकारचे गोड पदार्थ बनवण्यासाठी मदत करते.
दीवाळी हा सण पाच दिवसांचा असतो.प्रत्येक दिवशी मी घरासमोर रांगोळ्या काढते, दिवे लावते,तोरण लावते,फुलांनी घर सजवते.
दिवाळीत आम्ही आमच्या नातेवाईकांकडे जाऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो,फराळ व मिठाई देतो.मी मित्र-मैत्रिणींसोबत फटाके वाजवते.आम्ही खूप मजा करतो.
दिवाळीत मी माझ्या कुटुंबासोबत खूप मस्ती आणि धमाल करते.दिवाळीच्या काही दिवस अगोदरच,कुटुंबातील सगळे लोक दिवाळीच्या तयारीला लागतात.
घराच्या सजावटीसाठी वस्तू विकत घेणे,फटाके व नवीन कपड़े घेणे,फराळ व मिठाई बनवण्यासाठी सामान विकत घेणे या सगळ्या तयारीमध्ये पूर्ण कुटुंब एकत्र येतो.
आम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवीची पूजा करतो,भाऊबीजेच्या दिवशी आम्ही सगळे भाऊ बहीण एकत्र येऊन भाऊबीज साजरा करतो.
अशा प्रकारे, मी माझ्या कुटुंबासोबत आनंदाने दिवाळी साजरा करते.