Diwali chi mahiti marathi madhe (in marathi)
Answers
दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. [१]हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. [२]या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते.[३] पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात.[४] हा सण साधारणपणे ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान येत असतो. [५]या सणाला भारतात बव्हंश ठिकाणी सुटी असते.
Answer:
दिवाळी उत्सवाच्या पहिल्या दिवशी घर व कार्यालयीन परिसराला साफसफाई करुन सजविले जाते. धन व ऐश्वर्या ची प्रतीक असलेल्या देवी लक्ष्मीचे दारात रांगोळी व पारंपरिक चिन्हांनी सुशोभित करून स्वागत केले जाते. तिचे दीर्घ प्रतिक्षे नंतर चे आगमन दर्शविण्यासाठी घरात तांदळाचे पीठ व कुंकवाने छोटे छोटे पदचिन्ह काढल्या जातात. रात्रभर दिव्यांची आरास केल्या जाते. हा दिवस अतिशय शुभ मानला जात असल्याने, ह्या दिवशी गृहिणी सोनं वा चांदीची भांडी खरेदी करतात. भारतात कुठे कुठे पशु धनाची ही पूजा केली जाते. हा दिवस धन्वंतरी (आयुर्वेदाची देवता अथवा देवांचे वैद्य) चा जन्मदिन म्हणून ही साजरा केला जातो. ह्या दिवशी मृत्यू देवता यमाचे पूजन करण्यासाठी रात्रभर दिवे जाळले जातात. म्हणूनचं ह्याला यमदीपदान असे सुद्धा जाणले जाते. आकस्मिक मृत्यू चे भय दूर करण्यासाठी हे पूजन केले जाते.
दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. भगवान बुद्धाने म्हटले आहे, "आपो दीपो भवः", म्हणजे तुम्ही स्वतःचं प्रकाश रूप व्हा. सगळे वेद व उपनिषद हेच सांगतात, की तुम्ही सारेच प्रकाशमान आहात. तुमच्यापैकी कोणी प्रकाशित झाला आहात तर कोणी अद्याप व्हायचे आहेत. पण सर्वांमध्ये प्रकाश देण्याची क्षमता आहे. दिवाळीच्या दिवशी आपण सारे अंधकाराला दूर सारतो. अंधकार मिटविण्यासाठी केवळ एक तिरीप पुरेशी नाही. त्यासाठी पूर्ण समाजाला प्रकाशित व्हावे लागेल. परिवारातील केवळ एक सदस्य प्रसन्न असेल तेवढे पुरेसे नाही, प्रत्येक सदस्याला प्रसन्नचित्त व्हावे लागेल. जर एकसुद्धा नाराज राहिला, तर बाकी सगळे प्रसन्न राहू शकत नाही. म्हणून प्रत्येक घराला प्रकाशमान व्हावे लागेल. दुसरी गोष्ट आपल्या सर्वांच्या आयुष्यात आचरावी लागेल ते म्हणजे माधुर्य. इतरांना केवळ मिठाई वाटू नका, तर सगळ्यांना तो गोडवा वाटा. दिवाळीचा सण आम्हाला हेच सांगतो की जर कुणाबद्दल मनात काही अढी, ताण असेल तर फटाक्यासारखे त्याला उडवून लावा आणि आयुष्याची परत नव्याने सुरुवात करून, उत्सव साजरा करा.
Explanation: