Diwali essay in Marathi 100 words
harshit8172:
bolo
Answers
Answered by
163
सर्व सणांमध्ये दिवाळी हा माझा आवडता सण आहे . दिवाळी हा सन अश्विन महिन्यात येतो . त्यावेळी शाळेला सुट्टी असते .
दिवाळीच्या दिवसांत आमच्या घरी खूप धामधूम असते . आम्ही घर सजवायला दारावर तोरण बांधतो . मी आणी ताई घरीच कंदील करतो . लाडू, करंज्या , चिवडा , चकल्या असे वेगवेगळे पदार्थ आई बनवते . त्यावेळी तिला आम्ही मदत करतो .
आईबाबा दिवाळीला आम्हांला नवीन कपडे घेतात . नवीन कपडे घालून आम्ही आनंदाने फिरतो . आम्ही खूप फटाके वाजवतो . मित्रांबरोबर खेळतो आणि भरपूर भटकतो .
दिवाळीच्या दिवसांत आम्ही दारात रांगोळी काढतो . संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करतो . भाऊबिजेला ताई मला ओवाळते . मी तिला भेटवस्तू देतो .
दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे . तो आनंदाचा सण आहे . दिवाळी सगळीकडे उल्हास असतो . म्हणून दिवाळी हा सण मला खूपच आवडतो
Answered by
0
Answer:
yes we make mor things to eat in diwali and it is the festival which is very big in all fest
Similar questions