India Languages, asked by khalid69, 1 year ago

don divas marathi kavita appreciation in point format

Answers

Answered by gadakhsanket
189

नमस्कार,

नारायण सुर्वेंची 'दोन दिवस' ही कविता इ. १० वी च्या मराठी अक्षरभारती पुस्तकाचा भाग आहे. या कवितेत कवी दुःखात असतानाही सुखाची वाट पाहणे हे जीवनकौशल्य नमूद करतात.


★ दोन दिवस कवितेचे रसग्रहण -

कवी नारायण सुर्वे म्हणतात -

'एक सामान्य शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करतो. आजचे दुःखच उद्या सुखात रूपांतर होईल याचीच तो वाट पाहत असतो. सुखाची वाट पाहत दिवस मोजत असतो.'

'अनेक दिवस झाले, चंद्र-ताऱ्यांच्या स्तिथीत बदल झाले, परंतु या सगळ्याचा आनंद लुटण्याऐवजी शेतकऱ्याचे जीवन दोन वेळचे जेवण मिळवण्यातच व्यथित झाले.'

'वडिलोपार्जित गुलामगिरी सोडविण्यासाठी खूप कष्ट केले पण काही यश आले नाही. कधी स्वाभिमानाने कष्ट केले, तर कधी अपमानही सहन करावा लागला.'

'या कष्टमय जीवनात कठोरपणे सगळ्या संकटांना सामोरे गेले तर कधी असेही क्षण आले की असह्य होऊन अश्रू हाच पर्याय उरला.'

'माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे सगळ्यांच्या सुखाचा विचार करून वागलो. सर्व संकटांचा सामना केला. जीवनाचे शिक्षण मिळाले.'

'खडतर अशे कष्ट करून सुख येण्याची वाट पाहिली परंतु आपले आयुष्य या आशेतच गेले याची आता प्रचिती झाली आहे.'


धन्यवाद...


Similar questions