Hindi, asked by prashantsutar339, 3 months ago

Dr bana saheb ambdekar compsition in marathi ​

Answers

Answered by Anonymous
2

Explanation:

Home कथनात्मक Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध

Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध

By ADMIN

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध बघणार आहोत. या पानावर पुर्ण 4 निबंध दिले आहेत. भारतासाठी केलेले कार्य व समाज बांधवासाठी केलेला त्‍याग व कार्य सविस्‍तरपणे स्‍पष्‍ट केले आहेत. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर - म्हणजेच, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी भारत स्वतंत्र झाल्याबरोबर भारतीय जनतेला एक मौलिक संदेश दिला होता. तो असा की, लोकशाहीचे अस्तित्व आपणांस टिकवायचे असेल, तर आपले सामाजिक आणि आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गांचाच अवलंब केला पाहिजे. केवढी दुरदृृृृृष्‍टी होती या संदेशात !

पण आपण आज - अगदी स्वतंत्र होऊनही साठ वर्षे झाली तरी या गोष्टी आपल्या आचरणात आणल्या नाहीत. कोणत्याही क्षुल्लक कारणाने प्रक्षोभ झाला की, लगेच जाळपोळ, मोडतोड केली जाते. कारण आपण तेव्हा हे विसरलेले असतो की, अशा विध्वंसात आपण आपलेच नुकसान करत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र आणि साहित्य यांतून आपल्याला असे मोलाचे संदेश मिळत असतात.

१४ एप्रिल १८९१ मध्ये एका गरीब घरात बाबासाहेबांचा जन्म झाला होता. त्यात भर म्हणजे 'मागासलेली जात' हा शिक्का उमटलेला. पण ते कोणत्याही अडचणीला डगमगले नाहीत. कशासाठीही कुरकुरत बसायचे नाही, हा तर त्यांचा निश्चय होता. त्यामुळे चाळीतल्या गोंगाटातही ते उत्तम अभ्यास करू शकले. माणूस फक्त ज्ञानामुळेच दु:खमुक्त होऊ शकतो, हे त्यांनी जाणले होते.

डॉ. आंबेडकर यांनी स्वत:ची उन्नती तर साधलीच, पण त्यांचा मोठेपणा असा की, ते आपल्या अन्यायग्रस्त समाजालाही विसरले नाहीत. आयुष्यभर खडतर ज्ञानसाधना करून विधिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांवर त्यांनी प्रभुत्व संपादन केले होते.

Similar questions