India Languages, asked by jayaadit401, 4 months ago

eassy on Farmers life in marathi​

Answers

Answered by yamin1971mya
1

Explanation:

αทઽખ૯૨✎

========================

आपला भारत देश हा ऐंशी टक्के कृषिप्रधान आहे. भरपूर लोकांचा शेती हा परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. जर आपल्या या शेतकरी बांधवाने त्याच्या शेतात काही  पिकवले नाही तर आपण काय खाणार? आपण कसे जगणार? पण त्याच्या या कष्टाला आणि मेहनतीला म्हणजेच त्याच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळत नाही. त्याला बऱ्याच नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. जसे की कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ तर कधी वादळ यामुळे शेतीचे बरेच नुकसान होते. त्यामुळेच तर आपला शेतकरी बांधव हा आत्महत्येचा मार्ग अवलंबतो. पण यावर आपण सर्वांनी मिळून काहीतरी केले पाहिजे

आपला हा शेतकरी बांधव रात्रंदिवस शेतात राबतो. म्हणूनच तर ‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती मेरे देश की धरती’ यांसारख्या ओळी आपल्या ओठांवर सहज येतात. ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’, ‘जिथे राबती हात तेथे हरी’ अशी शेतीच्या महतीची वचने आपण नेहमी ऐकतो, बोलतो व कौतुकाने लिहितो. परंतु शाळेतील परीक्षांमधील गुणवंताच्या तोंडून मी डॉक्टर, मी इंजिनिअर होणार अशा महत्वाकांक्षा बाहेर पडतात. पण यापैकी कोणीच ‘मी एक आदर्श शेतकरी होणार’ आणि मी माझे जीवन शेतकामामध्ये झोकून देणार असे कोणीच म्हणत नाही. शेतकरी म्हणजे दुय्यम समाज असा दृष्टिकोन आजच्या या नवीन पिढीचा झाला आहे.

‘जय जवान जय किसान’ म्हणून आपण शेतकऱ्यांना गौरवितो. पण त्या शेतकऱ्यांच्या जीवनाचा त्यांच्या अडचणींचा आपण कधीच विचार करत नाही. आपल्या या मातृभूमीसाठी, देशासाठी अन्नधान्य पिकवणारा, सुजलाम सुफलाम धरती बनवणारा हा शेतकरी स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस शेतात राबतो. परंतु दोन वेळचे पोटभर अन्नही नीट त्याच्या वाट्याला येत नाही आणि ऐशआरामाचे जीवनही तो जगू शकत नाही.

शेतमालाला मिळेल तो दर, सरकारचे वेगवेगळे कर, कायदे यामुळे त्याच्या एकूण उत्पन्नाच्या दहा टक्के उत्पन्नही त्याला मिळत नाही. परंतु या सर्व शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील नफ्याला चटावलेला, सर्व नियम, कायदेकानून खिशात घेऊन फिरणारा आणि पैशाने लालची झालेला व्यापारी या गरीब शेतकऱ्याला पिळत असतो नागवत असतो. अंगमेहनत करूनही त्याच्या कष्टाला मोल राहत नाही असा हा असहाय्य शेतकरी एकदम खचलेला असतो. व्यापारी, दलाल मात्र कष्ट न करताही पैसे लुबाडत असतात आणि शेतकऱ्याचा माल कमीत कमी किमतीत खरेदी करून आपल्या शेतकरी बांधवाला नाराज करतात. त्यामुळे त्याच्या कष्टाला किंमत राहत नाही.

☺️☺️

Answered by aphmau123
0

Answer:

========================

आपला भारत देश हा ऐंशी टक्के कृषिप्रधान आहे. भरपूर लोकांचा शेती हा परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. जर आपल्या या शेतकरी बांधवाने त्याच्या शेतात काही  पिकवले नाही तर आपण काय खाणार? आपण कसे जगणार? पण त्याच्या या कष्टाला आणि मेहनतीला म्हणजेच त्याच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळत नाही. त्याला बऱ्याच नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. जसे की कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ तर कधी वादळ यामुळे शेतीचे बरेच नुकसान होते. त्यामुळेच तर आपला शेतकरी बांधव हा आत्महत्येचा मार्ग अवलंबतो. पण यावर आपण सर्वांनी मिळून काहीतरी केले पाहिजे

आपला हा शेतकरी बांधव रात्रंदिवस शेतात राबतो. म्हणूनच तर ‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती मेरे देश की धरती’ यांसारख्या ओळी आपल्या ओठांवर सहज येतात. ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’, ‘जिथे राबती हात तेथे हरी’ अशी शेतीच्या महतीची वचने आपण नेहमी ऐकतो, बोलतो व कौतुकाने लिहितो. परंतु शाळेतील परीक्षांमधील गुणवंताच्या तोंडून मी डॉक्टर, मी इंजिनिअर होणार अशा महत्वाकांक्षा बाहेर पडतात. पण यापैकी कोणीच ‘मी एक आदर्श शेतकरी होणार’ आणि मी माझे जीवन शेतकामामध्ये झोकून देणार असे कोणीच म्हणत नाही. शेतकरी म्हणजे दुय्यम समाज असा दृष्टिकोन आजच्या या नवीन पिढीचा झाला आहे.

‘जय जवान जय किसान’ म्हणून आपण शेतकऱ्यांना गौरवितो. पण त्या शेतकऱ्यांच्या जीवनाचा त्यांच्या अडचणींचा आपण कधीच विचार करत नाही. आपल्या या मातृभूमीसाठी, देशासाठी अन्नधान्य पिकवणारा, सुजलाम सुफलाम धरती बनवणारा हा शेतकरी स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस शेतात राबतो. परंतु दोन वेळचे पोटभर अन्नही नीट त्याच्या वाट्याला येत नाही आणि ऐशआरामाचे जीवनही तो जगू शकत नाही.

शेतमालाला मिळेल तो दर, सरकारचे वेगवेगळे कर, कायदे यामुळे त्याच्या एकूण उत्पन्नाच्या दहा टक्के उत्पन्नही त्याला मिळत नाही. परंतु या सर्व शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील नफ्याला चटावलेला, सर्व नियम, कायदेकानून खिशात घेऊन फिरणारा आणि पैशाने लालची झालेला व्यापारी या गरीब शेतकऱ्याला पिळत असतो नागवत असतो. अंगमेहनत करूनही त्याच्या कष्टाला मोल राहत नाही असा हा असहाय्य शेतकरी एकदम खचलेला असतो. व्यापारी, दलाल मात्र कष्ट न करताही पैसे लुबाडत असतात आणि शेतकऱ्याचा माल कमीत कमी किमतीत खरेदी करून आपल्या शेतकरी बांधवाला नाराज करतात. त्यामुळे त्याच्या कष्टाला किंमत राहत नाही

Explanation:

hope it helps

Similar questions