eassy on holi in marathi
Answers
Answered by
0
Answer:
होळी ओकक्कजज्जफहधपुढशहवूहव्हेहहेहरहरहहर
Answered by
2
Answer:
होळी हा एक महत्वाचा सण आहे। होळीचा सण म्हणजे उत्साह व उल्हास हा सण फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला येतो। प्रत्येक गावात होळीसाठी एक जागा ठरलेली असते। तिला होळीचा माळ असे म्हणतात। तेथे एक खड्डा खणतात। त्यात झाडाची एक फांदी उभी ठेवतात। फांदीभोवती लाकडे रचतात। तिला फुलांनी सजवतात। हीच होळी होय। संध्याकाळी तेथे सर्व लोक जमतात। होळीची पूजा करतात। तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात। पूजा झाल्यावर होळी पेटवतात। मग लोक होळीभोवती नाचतात। गाणी म्हणतात। होळीत सर्व वाईट गोष्टी जाळून जातात, असे लोकांना वाटते। होळीचा दुसरा दिवस धुलीवंदनाचा असतो। या दिवशी लोक एकमेकांवर रंग उडवतात। आनंदाने नाचतात। मी आणि मित्र सकाळपासून रंग घेऊन फिरतो। एकमेकांना खूप रंगवतो। खूप मजा येते। होळी हा सण मला खूप आवडतो
Similar questions