India Languages, asked by shethniket9, 3 months ago

Eassy on मराठी माझा आवडीचा​

Answers

Answered by 1saba
1

Question is half can you post full question dear

Answered by Anonymous
7

Answer:

“माझा आवडता विषय” या विषयावर विद्यार्थ्यांना निबंध लिहावा लागतो. त्यासाठी आवडणाऱ्या विषयावर निबंध लिहताना जास्त अतिशयोक्ती न करता नक्की कोणत्या कारणांमुळे तो विषय आवडता आहे याचा कल्पनापूर्वक वास्तववादी विस्तार करायचा असतो. चला तर मग पाहूया कसा लिहायचा “माझा आवडता विषय” हा निबंध!

माझा आवडता विषय – विज्ञान ! मराठी निबंध ।

आमच्या शाळेत एकूण सहा विषय शिकवले जातात परंतु त्यामध्ये विज्ञान हा माझा आवडता विषय आहे. भाषेचे विषय तसेच गणित, इतिहास हे विषय मला सोप्पे वाटतात पण विज्ञानामुळे मला शिकण्याची एक नवीन प्रेरणा मिळत राहते. विज्ञानात रोज नित्य नवीन काहीतरी शिकायला मिळत असते. विज्ञानातील गणिते, प्रयोग, संकल्पना, नियम सर्व काही मला खूप आवडते.

मी आत्ता इयत्ता आठवीत शिकत आहे आणि आम्हाला विज्ञान हा विषय पाचवीपासून सुरू झाला. सुरुवातीला मला विज्ञानातले काहीही समजत नव्हते पण हळूहळू मला त्यामध्ये आवड निर्माण होऊ लागली. प्रत्येक दिसणाऱ्या सजीव आणि भौतिक वस्तूत, त्याच्या असण्यामागे आणि कार्य करण्यामागे असणारी कारणे ही खूप गूढ आहेत आणि ती आपल्याला माहीत असलीच पाहिजेत. अशी जाणीव मला होऊ लागल्यापासून मी अत्यंत प्रखरतेने विज्ञान विषयाचा अभ्यास करू लागलो.

आम्हाला कदम मॅडम विज्ञान विषय शिकवतात. त्यांनी विज्ञान विषयातल्या प्रत्येक व्याख्या, नियम, आणि प्रयोग आम्हाला अगदी उत्तमरित्या शिकवले आहेत. प्रत्येक प्रयोग हा संपूर्ण समजेपर्यंत शिकवला जातो. आमच्या शाळेत एक भव्य विज्ञानाची प्रयोगशाळा आहे. त्यामध्ये आमचे आठवड्यातून दोनदा विज्ञानाचे प्रयोग असतात. प्रयोग असताना मॅडम आम्हाला अगोदर प्रयोग करून दाखवतात आणि आम्ही नंतर मिळून सारेजण तोच प्रयोग करतो.

आमच्या घरीदेखील मी अधूनमधून विज्ञानाचे काही प्रयोग आजमावत असतो. माझी आई मात्र कधीकधी त्यामुळे वैतागते. बाबा मला संपूर्णतः सहाय्य करतात. विज्ञानातील एखादी संकल्पना मला समजत नसेल तर ते उत्तमरीत्या समजावून सांगतात. विज्ञान एकदम परिपूर्णरित्या समजण्यामागे माझ्या बाबांची देखील तेवढीच मेहनत आहे.

बुध्दीचा संपूर्णतः विकास आणि उपयोग हा तर्कशुद्ध विचाराने होत असतो. निसर्गातील कितीतरी अशा घटना आणि नियम आहेत जे अजून देखील शोधले गेलेले नाहीत. आत्तापर्यंत झालेला विकास आणि प्रगती ही विज्ञानाचीच देण आहे. मोबाईल्स, संगणक, तंत्रज्ञान, भौतिक सुविधा, दळणवळणाची साधने असे सर्वकाही विज्ञानामुळे मानवजातीला प्राप्त झाले आहे. विज्ञान हा विषय फक्त शाळेपुरता मर्यादित न ठेवता मी स्वतः टीव्ही आणि मोबाईलवर देखील विज्ञान हा विषय शिकतो.

मला भविष्यात शास्त्रज्ञ किंवा संशोधन क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. संशोधन हे नुसते विश्वास ठेवून होत नाही तर त्यामागे पुरावा द्यावा लागतो. आपण जेथे राहतो, जगतो, क्रिया करतो, आणि निसर्गात जे जे घडते त्या प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय कारण असते. ते कारण शोधले की त्याला विज्ञानातला शोध समजला जातो. आत्तापर्यंत लागलेले शोध जसे की विद्युत उपकरणे, संगणक, मोबाईल, वाहने यामुळे आपले आयुष्य किती सुखकर झाले आहे, याचा अंदाज आपल्याला पूर्वीच्या लोकांचे आयुष्य पाहिल्यावर येऊ शकतो.

विज्ञान हे प्रत्येक दिवशी नवीन होत चालले आहे. एका अणुच्या शोधातून आजपर्यंत झालेला विकास पाहता भविष्यात आपण उज्ज्वल प्रगतीचे स्वप्न पाहू शकतो. विज्ञान हा विषय प्रत्येकाने जीवनात अनुभवण्याची गरज आहे तर आणि तरच मानवी नीतिमूल्ये, बुद्धी आणि अस्तित्व यांचा विकास होऊ शकतो नाहीतर धार्मिक अराजकता, पाखंड आणि अंधश्रद्धा सर्वत्र पसरेल. आतापर्यंत विज्ञान हा विषय मी पाठ्यपुस्तकात जास्त अभ्यासला आहे. परंतु मी इथून पुढे ग्रंथालयातील विज्ञाननिष्ठ पुस्तकेसुद्धा वाचायला सुरुवात करणार आहे.

मराठी निबंध

Explanation:

Hope It will Help You!!

Plz Mark as brainliest!!

♛┈⛧┈♡ ᴍɪss ᴋᴀᴍɪɴɪ ʜᴇʀᴇ♡┈⛧┈♛

ғʟʟᴏᴡ ʙᴀᴄᴋ ⚡

Similar questions